Dhanatrayodashi 2022: देव आणि असुरांनी समुद्रमंथन का केले, त्यातून कोणती 14 रत्ने बाहेर आली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanatrayodashi 2022

Dhanatrayodashi 2022: देव आणि असुरांनी समुद्रमंथन का केले, त्यातून कोणती 14 रत्ने बाहेर आली?

धार्मिक ग्रंथांच्या आणि पुराणिक कथेंच्या नुसार, अमृत प्राप्तीसाठी देव आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन केले होते, ज्यामधून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर पडले. याशिवाय अनेक गोष्टी समुद्रातून बाहेर आल्या होत्या. त्यापैकी काही देवांकडे गेले आणि काही असुरांनी ठेवले.

या वेळी धनत्रयोदशीचा सण शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशासह प्रकट झाले होते. त्याआधी 12 रत्ने बाहेर आली होती. 

देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन का केले आणि त्यातून कोणती रत्ने निघाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. चला या विषयी जरा जाणून घेऊयात. 

धार्मिक ग्रंथांनुसार, एकदा महर्षी दुर्वासांनी इंद्र देवाला त्यांची सुगंधी माळ भेट म्हणून दिली. इंद्राने ती माळ आपल्या हत्तीला दिली. हत्तीने ही माळ पायाखाली तुडवली. आपल्या भेटीचा अशा प्रकारे अपमान होत असल्याचे बघून महर्षी दुर्वासांनी इंद्राला ज्या स्वर्गाचा आणि त्याच्या ऐश्वर्याचा तुला गर्व आहे तो स्वर्ग श्रीरहित अर्थात धनरहित होण्याचा शाप दिला, त्यामुळे स्वर्गातील वैभव आणि ऐश्वर्य संपले. 

मग सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. भगवान विष्णूंनी त्यांना असुरांसोबत समुद्रमंथन करण्याचा मार्ग सुचवला आणि सांगितले की समुद्रमंथनातूनही अमृत निघेल, जे प्यायल्याने तुम्ही अमर व्हाल. जेव्हा देवतांनी हे असुरांचा राजा बळी याला सांगितले तेव्हा त्यांनीही समुद्रमंथन करण्यास तयार केले. नागांच्या राज्याला वासुकीला दोराप्रमाणे मंदारचल पर्वताला गुंडाळून समुद्रमंथन करण्यात आले. अशा प्रकारे समुद्रमंथनातून एक एक करून 14 रत्ने बाहेर आली. 

हेही वाचा: Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

या रत्नांबद्दल अधिक जाणून घ्या...

1. कालकूट विष: सर्वात आधी कालकूट विष समुद्रमंथनातून बाहेर आले. महादेवांनी हे विष प्यायले आणि ते आपल्या कंठात बसवले, त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव पडले.

2. कामधेनू: समुद्रमंथनात दुसऱ्या क्रमाने कामधेनूचा उदय झाला. तिला अग्निहोत्राचे (यज्ञ) साहित्य तयार करायचे होते. म्हणून ब्रह्मवादी ऋषींनी तिचा स्वीकार केला.

3. उच्छैश्रव घोडा: समुद्रमंथनातून नंतर उच्छैश्रव घोडा निघाला. त्याचा रंग पांढरा होता. असुरांचा राजा बळी याने तो घोडा आपल्याजवळ ठेवले.

4. ऐरावत हत्ती: समुद्रमंथनात ऐरावत हत्ती चौथ्या क्रमांकावर बाहेर आला, त्याला चार मोठे दात होते. त्याचे तेज कैलास पर्वतापेक्षा मोठे होते. देवराज इंद्राने ऐरावत हत्ती आपल्या जवळ ठेवला.

हेही वाचा: Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

5. कौस्तुभ मणि: यानंतर समुद्रमंथनाने कौस्तुभ मणि प्राप्त झाला, जो भगवान विष्णूने आपल्या हृदयावर धारण केला.

6. कल्पवृक्ष: समुद्रमंथनात सहाव्या क्रमाने बाहेर पडलेला कल्पवृक्ष, इच्छा पूर्ण करतो, त्याची लागवड देवतांनी स्वर्गात केली होती.

7. रंभा अप्सरा: समुद्रमंथनाच्या सातव्या क्रमात रंभा नावाची अप्सरा उदयास आली. तिने सुंदर कपडे आणि दागिने घातले होते. तीची चाल मनाला भिडणारी होती. ती देवांकडे गेली.

8. देवी लक्ष्मी: देवी लक्ष्मी समुद्रमंथनात आठव्या स्थानी अवतरली. असुर, देवता, ऋषी इत्यादी सर्वांना लक्ष्मी देवी आपल्याकडे यावी अशी इच्छा होती, परंतु लक्ष्मीने भगवान विष्णूची निवड केली.

हेही वाचा: Diwali Recipe: खारे शंकरपाळे कसे तयार करायचे?

9. वारुणी देवी: यानंतर समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या वारुणी देवीला राक्षसांनी देवांच्या आज्ञेने नेले. वारुणी म्हणजे मद्य.

10. चंद्र: मग समुद्रमंथनातून चंद्राचा उदय झाला. भगवान शिवाने चंद्र डोक्यावर धरला होता.

11. पारिजात वृक्ष : यानंतर समुद्रमंथनातून पारिजात वृक्षाचा उदय झाला. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला स्पर्श केल्याने थकवा दूर होतो. हेही देवतांच्या अंगणात गेले.

12. पंचजन्य शंख: पंचजन्य शंख समुद्रमंथनातून 12व्या स्थानी बाहेर आला. भगवान विष्णूंनी ते घेतले. शंख हे विजयाचे प्रतिक मानले जाते आणि त्याचा नाद देखील खूप शुभ मानला जातो.

13 आणि 14. भगवान धन्वंतरी आणि अमृत कलश: समुद्रमंथनाच्या शेवटी, भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन बाहेर आले. स्वतः भगवान धन्वंतरी आणि अमृत कलश यांचाही रत्नांमध्ये समावेश आहे.