Diwali 2022 : तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा वसुबारसच्या मराठी शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali 2022

Diwali 2022 : तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा वसुबारसच्या मराठी शुभेच्छा

Vasubaras Wishes in Marathi 2022 : वसुबारस ही गोवत्स द्वादशीचा दिवस म्हणून ओळखली जाते. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा धेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

हेही वाचा: Diwali 2022: थ्री इन वन मेकअपचा वापर करून या फेस्टिव्ह सिझनला व्हा पाच मिनिटात तयार

दीपावलीच्या काळात अस्थिरतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी दिवाळीपूर्वी गोवत्सद्वादशीचा उपवास केला जातो. वसुबारसला गायीची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामुळे व्यक्तीमध्ये दयावृत्ती वाढते. गायीची पूजा माणसाला चराचरात दैवी तत्वाचे दर्शन घेण्याची शिकवण देते.

हेही वाचा: Diwali Festival 2022 : दिवाळी फराळातून बचतगटांना रोजगाराची संधी!

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.

गाय आणि वासराची पूजा करून

त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

हेही वाचा: Diwali : विद्यार्थ्यांकडून अनाथांची दिवाळी गोड

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा: Diwali 2022: येत्या दिवाळीला रात्री करा दक्षिणावर्ती शंखाची पूजा अन् घालवा आर्थिक अडचणी

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात

तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा

धेनु वासराची…

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!

हेही वाचा: Diwali 2022 : दोस्तांना दिवाळीसाठी सोन पापडी gift करावं की मिम्स ? वाचा

सर्वांना वसुबारसच्या

हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी

घरोघरी यश-समृद्धी,

सुख नांदू देत.

हेही वाचा: Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

हेही वाचा: Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण

दिवाळीचा पहिला दिवस,

ही दिवाळी तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबीयांना

सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.

वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन

वेगवेगळ्या सणांच्या

रूपाने केले जाते.

ह्यात पशू, पक्षी,

वृक्ष यांना मोठे महत्व आहे.

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी

असणारे सेंद्रिय नाते सुदृढ

करणारा वसुबारस हा सण.

या सणानिमित्ताने शुभेच्छा

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,

गायी आणि वासरांची

सेवा आणि संरक्षण करा.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!