Diwali 2022 : दिवाळीच्या प्रत्येक दिवशी लावा या संख्येने दिवे; उत्तम आरोग्यासह लाभेल समृद्धी

Diwali Festival 2022 :
Diwali Festival 2022 :esakal

Diwali Festival 2022 : लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारा सण म्हणजे कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जाणारा दिवाळी. दिवाळी आली की चोहीकडे दिव्यांचा प्रकाश असतो. दिवाळीत सर्वत्र दिवे लावले जातात म्हणुन या सणाला दीपोत्सव असेही म्हणतात. दिवाळीमध्ये आजकाल जरी इलेक्ट्रीक लायटींग, मेणबत्ती किंवा फ्लोटिंग कँण्डलला मागणी असली तरी मातीच्या दिव्यांची क्रेझ आजही कायम आहे. धनत्रयोदशीपासुन ते लक्ष्मीपुजनपर्यंत जे दिवे लावले जातात त्यांच्या संख्येत बदल होत जातात. तुम्हाला या दिव्यांच्या संख्येत होणाऱ्या बदलांच्या मागचं कारण माहितीये का? चला तर मग जाणुन घेऊ या मागचे नेमके कारण काय आहे.

(Diwali Festival 2022 Dhantrayodashi Lakshmi Poojan Narak Chaturdashi How Many Lamps to Light According to Astrology)

Diwali Festival 2022 :
Diwali 2022 : या दिशेपासून सुरु करा दिवाळीची साफ-सफाई; लक्ष्मी-कुबेराचा लाभेल आशिर्वाद

धनत्रयोदशीला यमदेवा प्रित्यर्थ लावला जातो दिवा

धनत्रयोदशीला कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासह घरातील पिडा, दुःख, दोष निवारण व्हावे यासाठी यमदेवा प्रित्यर्थ दिवा लावला जातो. हळद घालून कणकेचा हा दिवा तयार केला जातो. हा दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करुन लावला जातो. याला यम दिपदान असे म्हणतात.

धनत्रयोदशीला लावा इतके दिवे...

धनत्रोयदशीला दिवे लावण्याचा नियम आहे. या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य द्वारावर 13 आणि घरामध्ये सुद्धा 13 दिवे प्रज्वलित केले जातात. या दिवशी मातीच्या पणत्या तिळाचे तेल घालून प्रज्वलीत केल्या जातात.

Diwali Festival 2022 :
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला ‘हे’ उपाय करा; नशीब होईल धन-धना-धन

नरक चतुर्दशीला लावा इतके दिवे...

नरक चतुर्दशीला नियमानुसार 14 दिवे लावावे असे सांगितले जाते. परंतु घरात नरक चतुर्दशीच्या दिवशी मुख्यतः पाच दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. यामध्ये एक दिवा घरातील देवघरात, दुसरा दिवा स्वयंपाकघरात, तिसरा दिवा घरात पिण्याचे पाणी जेथे ठेवले आहे त्या स्थळी, चौथा दिवा पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली आणि पाचवा दिवा घरातील मुख्यद्वाराजवळ प्रज्वलित केला पाहिजे. यासह अधिक संख्येने दिवे दिवे लावायचे असल्यास 7,13,14, व 17 अश्या संख्येत लावू शकतो.

Diwali Festival 2022 :
Diwali 2022: दिवाळीपूर्वी 'या' वस्तू घरातून बाहेर काढा, नाहीतर..

लक्ष्मीपुजनाला लावा इतके दिवे...

दिवाळी सणातील सर्वात महत्वपूर्ण आणि प्रमुख दिवस ज्याला आपण दिवाळी म्हणुन संबोधतो तो म्हणजे कार्तिक अमावस्येला केले जाणारे लक्ष्मीपुजन. अशी मान्यता आहे की कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली होती जिला धन, वैभव, ऐश्वर्य आणि सुख- समृध्दीची देवी मानतात. या दिवशी लक्ष्मी स्वागतासाठी दिवे लावले जातात. जेणेकरून अमावस्येच्या रात्री अंधकारात दिव्याने वातावरण प्रकाशमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी गणपती, लक्ष्मी या देवांचे पुजन तथा आभूषण, धन, पैसा आदींचे पुजन करून 13 किंवा 26 दिवे प्रज्वलित केले जाते. दिवाळी हा सण अंधःकारातून प्रकाशाकडे जाणारा असल्याने दिलेल्या दिव्यांच्या उपरोक्त संख्येपेक्षा अधिक दिवे प्रज्वलित करणेही लाभदायक असते असे ज्योतिष तज्ज्ञ विजय जोशी सांगतात.

Diwali Festival 2022 :
Laxmi Pujan 2022: यंदा लक्ष्मीपूजन साजरे करतांना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com