Hanuman Jayanti : हनुमान जयंतीला करा 'या' गोष्टी, वर्षभर राहाल संकटमुक्त

आज आपण त्या गोष्टी कोणत्या, या विषयी जाणून घेणार आहोत
Hanuman Jayanti
Hanuman Jayantigoogle

Hanuman Jayanti : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा. या तिथिला हनुमान जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, हनुमानजी हे रुद्रावतार आहे. त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी झाला होता.

संकटमोचन या नावानेही हनुमान ओळखले जातात कारण हनुमान संकट मुक्त करतात. संकटातून मार्ग काढण्यासाठी हनुमान भक्त हनुमानाचा उपवास करतात. मंत्र पठन करतात. पुजा आराधना करतात पण तुम्हाला माहिती आहे का हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुम्ही वर्षभर संकटमुक्त राहाल.

आज आपण त्या गोष्टी कोणत्या, या विषयी जाणून घेणार आहोत. (do these things on Hanuman Jayanti you will be problem free for a year )

  • जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही मानसिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तीची सेवा केली तर तुमचा कायमचा मानसिक तणाव दूर होतो. मानसिक तणावापासून मुक्तता मिळवायची असेल तर हा उपाय करावा.

  • हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ११ वेळा हनुमान चालीसाचे पठन केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि दु:ख दुर होतात.

  • हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला सिंदूर अर्पण करा. त्यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येते.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : रामदास स्वामींनी स्थापन केलेली ११ मारुती मंदिरे
  • हनुमान जयंतीच्या दिवशी रक्तदान करा यामुळे अपघात किंवा आजारांपासून तुम्ही दूर राहता. हेल्दी लाईफसाठी हा उपाय नक्की करावा.

  • अनेकदा मेहनत करुनही मनासारखं फळ मिळत नाही. अशावेळी जर हनुमान जयंतीला तुम्ही एका खास मंत्राचा जाप केल्यास तुम्हाला शुभ फळ मिळू शकतात. हनुमान जयंतीला ओम क्र क्रा क्रा सह भौमाय नमः मंत्राचा जप करावा.

  • अनेकदा व्यवसायात सातत्याने अपयश येतं अशावेळी जर तुम्ही हनुमानजयंतीला शेंदूर रंगाचं लंगोट हनुमानजीला अर्पण केले तर तुम्हाला व्यवसायात कधीच अपयश येणार नाही.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti 2023 : तुमची मुलं दृष्ट लागून वारंवार आजारी पडताय? मग हनुमान जयंतीला करा हा उपाय
  • पैलवान किंवा कुस्तीपटू हे अनेकदा बजरंगबलीचे भक्त असतात. ते किंवा इतरांना शक्तीवान व्हायचे असेल तर त्यांनी हनुमान चालीसा, सुंदरकांड, बजरंग बाण, रामरक्षा स्रोताचे पठन करावे.

  • जर तुम्हाला नोकरी व्यवसायात यश हवे असेल तर 108 वेळा तुळशीच्या पानांवर प्रभू राम लिहून याचा हार हनुमानजींना अर्पण करावा. यामुळे तुम्हाला करीअरमध्ये नेहमी सुयश मिळणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com