
लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे
पण यंदा बाप्पाचे स्वागत करताना काही नियम पाळायला हवेत
हे ७ कोणते आहेत, जाणून घ्या
Ganesh Festival News : महाराष्ट्राचा आत्मा असलेला गणेश चतुर्थीचा सण यंदा २७ ऑगस्टपासून उत्साहात साजरा होणार आहे. देशभरात बाप्पाच्या भक्तीने वातावरण भक्तिमय झालेले असेल. हिंदू धर्मात सर्व शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण बाप्पा बुद्धी आणि सौभाग्याचा दाता मानला जातो. या सणात २७ ऑगस्टला घरोघरी बाप्पाची मूर्ती स्थापित होईल आणि ६ सप्टेंबरला विसर्जनाने सणाची सांगता होईल. तर तुम्हीही यंदा घरी बाप्पाचे स्वागत करताना हे ७ नियम अवश्य पाळा.