

Sakal
(सौ. अस्मिता दीक्षित पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230)
गजानन महाराज प्रकट दिन , स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी सेवेची मोठीच पर्वणी. मी गेले ऐसे मानु नका भक्तीत अंतर करू नका असे वचन देणारे गजानन महाराज आजही भक्तांना प्रचीती देत आहेत. ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले अनुभवले ते किती भाग्यवान असा विचार माझ्या मनात नेहमीच येतो. महाराजांच्या सेवेची प्रत्यक्ष संधी म्हणजे अनेक जन्मांचे पुण्यच. महाराज हा भक्तांचा श्वास आहे. त्यांच्याच आधाराने आपले जीवन आहे. प्रत्येक क्षणी आपल्याला तारणारा हा तारणहार अंतर्ध्यान पावला पण भक्तांना सुनितीचा मार्ग दाखवणारा आणि माणसातील देव ओळखा हा संदेश देणारा हा युगपुरुष आजही आपल्यातच आहे, त्याला ओळखता आले पाहिजे आणि त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारता आली पाहिजे.