Ganesh Festival 2023 : विघ्ननाश आणि बुद्धिप्राप्ती! शास्त्रात ५ देवतांची उपासना का सांगितली जाते? इथे वाचा

सृष्टीमधील व पूजन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामधील पंचमहाभूतांचे संतुलन कायम रहावे, यासाठी या पाच देवतांची उपासना सांगितलेली आहे.
Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023 esakal

Ganesh Festival 2023 : गणेशाची उपासना आदिनकालापासून आसेतुहिमाचल सर्वत्र होत आहे. 'कलौ चण्डी विनायकौ' असे शास्त्रात सांगितलेले आहे, अर्थात कलियुगात दुर्गा आणि गणपतीची उपासना शीघ्र फलप्रद होते, असे शास्त्र सांगते. तसेच आद्य शंकराचार्यांनी प्रसार केलेल्या पंचायतन पूजेमध्येही गणेशपूजन सांगितलेले आहे. पंचायतन पूजेमधील पाच देवता अर्थात गणपती, विष्णू, शंकर, सूर्य आणि दुर्गा या पंचमहाभूतांची प्रतीके आहेत. सृष्टीमधील व पूजन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामधील पंचमहाभूतांचे संतुलन कायम रहावे, यासाठी या पाच देवतांची उपासना सांगितलेली आहे.

कपिलतंत्रात 'आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्चैव महेश्वरी । वायोः सूर्यः क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः ॥' असे सांगितलेले आहे. अर्थात, आकाशतत्त्वाचा अधिपती विष्णू, अग्नितत्वाची दुर्गा, वायुतत्त्वाचा सूर्य, पृथ्वीतत्त्वाची देवता शंकर आणि जलतत्त्वाचा अधिपती गणपती सांगितलेला आहे.

Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023 : श्री गणेशास २१ दूर्वाच का अर्पण करायच्या? जाणून घ्या रहस्य

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या पीडेपासून मुक्तता होण्यासाठी कार्तिकेय किंवा गणपतीची उपासना व भक्ती करण्यास सांगितलेले आहे. (Ganesh Chaturthi Festival)

Ganesh Festival 2023
Ganesh Chaturthi 2023 : गणेशाला आवडणाऱ्या 21 संख्येचे रहस्य!

गणेश उपासनेने विघ्ननाश होतो व बुद्धिप्राप्ती होते, असे याज्ञवल्क्य स्मृतीत सांगितलेले आहे. बृहत्पाराशर स्मृतीतही गणेश उपासनेचा उल्लेख आलेला आहे. 'एतेन सम्पूज्य गणाधिदेवं विघ्नोपशान्त्यै' सर्व प्रकारची संकटे दूर व्हावी या उद्देशाने गणपतीची पूजा करावी. गणेश उपासनेने विघ्न निवारण होते म्हणजे नक्की काय होते? तर सारासार विवेक बुद्धी, अचूक निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी गणेश उपासकामध्ये वाढीस लागतात. त्यामुळे एकदा अचूक निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली की संकटे कशी येतील ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com