
Mahalaxmi Blessings June 27: उद्या, २७ जून, शुक्रवार आहे. चंद्र कर्क राशीत असणार आहे आणि शुक्र ग्रह मेष राशीत गोचर करेल, ज्यामुळे चंद्र-शुक्र यांचा चतुर्थ-दशम योग निर्माण होतो. तसेच, चंद्र आणि गुरु यांच्यात अनफा योगही तयार होईल. पुनर्वसु व पुष्य नक्षत्रांच्या संयोगामुळे रवि योगही प्रभावी राहील, ज्यामुळे गौरी योगाचा अनोखा संयोग उद्याच्या दिवसाला विशेष बनवेल.