Astro Tips : लक्ष्मी देवींची विशेष कृपा असते 'या' राशींवर; कधीही उद्भवत नाही पैशाच्या समस्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips for Money

Astro Tips : लक्ष्मी देवींची विशेष कृपा असते 'या' राशींवर; कधीही उद्भवत नाही पैशाच्या समस्या!

Astro Tips for Money : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा संबंध कोणत्या ना कोणत्या देवतेशी अन् ग्रहाशी असतो अन् परिणामी संबंधित ग्रहाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. असं म्हणतात, की या राशींच्या लोकांवर कायम देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तसेच, हे लोक खूप लोकप्रिय होतात.

कर्क : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राला आनंद, मन आणि लक्ष्मी देवींचा कारक मानलं गेलं आहे. या कारणामुळे चंद्र राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक असते. या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेचे विशेष फळ मिळते आणि धनलाभ होतो.

वृषभ : या राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत माता लक्ष्मी या राशीच्या लोकांवर विशेष कृपा करते. या लोकांना त्यांच्या मेहनतीच्या जोरावर सर्वत्र यश मिळते. या लोकांना व्यवसायातही भरपूर यश मिळते.

तूळ : ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा आकर्षण, संपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक ग्रह मानला जातो. लक्ष्मी देवीच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

सिंह : या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीचे लोक दृढनिश्चयी, उत्साही आणि कुशाग्र असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. एवढेच नाही तर लक्ष्मी देवीच्या कृपेने या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

वृश्चिक : या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे. अशा स्थितीत हा ग्रह शक्ती, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते उंची गाठतात.