Astro Tips : सावधान! रात्री चुकूनही करु नका या गोष्टी; नाहीतर...

या सवयी आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकतात कारण याचा थेट परिणाम आपल्या प्रगतीवर आणि आरोग्यावर होतो.
Night Astro Tips
Night Astro Tipsesakal

Night Astro Tips : रोजच्या आयुष्यात अशा अनेक चुका आहेत ज्या आपण अनावधानाने करतो आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. खरंतर यांना चुकांहूनही जास्त वाईट सवयी म्हणता येईल कारण काळानुसार आपल्याला या सवयी लागल्या आहेत.

या सवयी आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकतात कारण याचा थेट परिणाम आपल्या प्रगतीवर आणि आरोग्यावर होतो. त्यामुळे जर तुम्हाला या सवयी असतील तर आत्ताच त्यांना टाळा.

Night Astro Tips
Astro Tips : या राशींचे लोक करता आहेत जगावर राज्य; पहा यात तुमची रास आहे का?
Astro Tips
Astro Tipsesakal

१. नखं खाणे : अनेकांना रात्री मुव्ही बघतांना, गप्पा मारतांना, पुस्तक वाचतांना नखं खाण्याची सवय असते, खरंतर कधीही नखं खाणं चुकीचच आहे कारण याने आपल्या नखातली घाण आपल्या पोटात जाते आणि आपल्याला आजार होऊ शकतात.

Night Astro Tips
Astro Tips: ज्योतिष शास्रानुसार या गोष्टी केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न राहिलं...
Astro Tips
Astro Tipsesakal

२. बेडवर बसून जेवणे : अर्थात ही सवय घरात कमी आणि बॅचलर्स राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त असते, पण गादीवरती बसून खाणे खरंच चुकीचे याने आपल्याला दारिद्रय येते आणि आजारपण सुद्धा येते.

Night Astro Tips
Astro Tips : तोतरे बोलतात? बोलण्याची शैली ठरवते तुमचं व्यक्तिमत्व
Astro Tips
Astro Tipsesakal

३. संध्याकाळी पैसे खर्च करणे : संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची असते यावेळेत जर तुम्ही नाहक खर्च करत असाल तर लक्ष्मीदेवी नाराज होतात आणि तुमची प्रगती थांबू शकते.

Night Astro Tips
Astro Tips: या दोन दिवशी अगरबत्ती लावल्यास होऊ शकते तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
Astro Tips
Astro Tipsesakal

४. रात्रभर कपडे घराबाहेर वाळत टाकणे : अनेकांना रात्री कपडे धुण्याची सवय असते, खरंतर दिवसभर ऑफिस असलेल्या लोकांसाठी रात्री कपडे धुणं जास्त सोपं असत असं असलं तरी ते कपडे रात्रीचे घराबाहेर वाळत टाकू नका. शिवाय दिवसभर वाळात टाकलेले कपडे ओले असले तरी घरात घेऊन वाळात टाका.

Night Astro Tips
Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध
Astro Tips
Astro Tipsesakal

५. रात्री किचन स्वच्छ न करता झोपणे : ही सवय अनेकांना असते, रात्री जेवण झाल्यावर ते कसं तरी आवरायच आणि तसंच ठेवून द्यायचं पण असं म्हणतात की लक्ष्मीदेवींचे दूत रात्री फिरत असतात आणि त्यांना असे अस्वच्छ किचन दिसले तर त्यांना ते अजिबात आवडत नाही. याने लक्ष्मी देवींचा कोप होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com