

Guru Purnima 2026 Rare Triple Rajyog Lucky Zodiac Signs
sakal
आषाढी एकादशीनंतर आता भक्तांचे लक्ष लागले आहे ते गुरुपौर्णिमा या पवित्र पर्वाकडे. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला ज्ञान, संस्कार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा होणारा हा दिवस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा स्वीकार करण्याचा मानला जातो.
वैदिक परंपरेनुसार, या दिवशी गुरुंचे पूजन करून त्यांच्याकडून ज्ञान, सद्बुद्धी आणि जीवनातील योग्य दिशा मिळावी, अशी प्रार्थना केली जाते. यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषीय दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाची मानली जात आहे. कारण या दिवशी गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग असे तीन शुभ योग एकाच वेळी निर्माण होत असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.