Hanuman Jayanti 2023 : हनुमंताची ही १२ नावे रोज जपा, अडकलेली कामे लागतील मार्गी

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये हनुमंताची अनेक नावे सांगण्यात आली आहेत.
Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023esakal

Hanuman 12 Names With Meaning In Marathi : संकटमोचन हनुमान असं म्हटलं जातं. कारण श्रीराम भक्त हनुमंताच्या स्मरणाने सर्व संकटं दूर होतात, अडचणी नाहीशा होतात असं मानलं जातं. अशा मारुतीरायाच्या गुणांचं वर्णन करताना भक्त थकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या वेगवेगळ्या गुणांवरून त्यांची विविध नावे आहेत

शास्त्रानुसार हनुमंताच्या या १२ नावांचे अर्थासहित रोज पठण केल्याने हनुमंताची कृपा बरसते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात, भय, समस्या दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते.

जाणून घेऊया १२ नावे आणि त्यांचे अर्थ

हनुमान - एकदा क्रोधात देवराज इंद्रांनी यांच्यावर आपल्या वज्राने प्रहार केला. वर्ज त्यांच्या हनुवटीवर लागला. हनुवटीवर (हनु) प्रहार झाल्याने त्यांचं नाव हनुमान झालं.

लक्ष्मणप्राणदाता - राम-रावण युद्धात रावण पुत्र इंद्रजीताने शक्तिबाणाने लक्ष्मणाला बेशुद्ध केलं. त्यावेळी हनुमंताने संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाला शुद्धीत आणलं होतं. तेव्हापासून हे नाव देण्यात आले.

दशग्रीवदर्पहा - दशग्रीव म्हणजे रावण आणि दर्पहा म्हणजे अहंकार तोडणारा. हनुमंताने बऱ्याचदा रावणाचं गर्व हरण केले आहे. म्हणून हे नाव देण्यात आले.

Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023 : तुमची मुलं दृष्ट लागून वारंवार आजारी पडताय? मग हनुमान जयंतीला करा हा उपाय

रामेष्ट - हनुमान श्रीरामांचे परम भक्त आहेत. प्रभू श्रीरामांचे ते प्रिय असल्याने त्यांंचं नाव रामेष्ट आहे.

फाल्गुनसुख - महाभारतानुसार अर्जूनाचं एक नाव फाल्गुन आहे. युद्धाच्यावेळी हनुमंत अर्जूनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होते. फाल्गुनसुख याचा अर्थ अर्जूनाचा मित्र.

पिंगाक्ष - पिंगाक्षाचा अर्थ आहे भूऱ्या डोळ्यांचा. अनेक धर्मग्रंथांमध्ये हनुमंतरायांचे डोळे भूरेघारे सांगण्यात आले आहे. त्यात पिंगट छटा आहेत. त्यामुळेच हे नाव पडले आहे.

Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती पावणार, या 4 राशींवर बरसणार बजरंगबलीची कृपा

अमितविक्रम - विक्रमचा अर्थ पराक्रमी आणि अमितचा अर्थ फार असा होतो. हनुमानाने आपल्या पराक्रमाने बरेच कार्य केले आहेत. जे करणं देवतांनापण कठीण होतं ते त्यांनी केलं आहे.

उदधिक्रमण - उदधिक्रमणाचा अर्थ आहे की, समुद्रालाही पार करणारा. माता सीतेचा शोध घ्यायला जाताना त्यांनी समुद्राला पार केलं. म्हणून हे नाव पडलं.

अंजनीसूत - माता अंजनीचे पुत्र म्हणून हनुमंताला अंजनीसूत हे नाव पडलं.

वायूपूत्र - हनुमंत पवन देवाचे मानस पुत्र मानले जातात. त्यामुळे त्याना पवनपुत्र किंवा वायूपुत्रदेखील म्हणतात.

Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti : एप्रिलमधे या राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा, सोन्यासारखं उजळेल भाग्य

महाबली - हनुमंताच्या बलाची, शक्तीची कोणतीही सीमा नाही. त्यामुळे त्यांना महाबली म्हणतात.

सीताशोकविनाशन - माता सीतेच्या शोकाचे म्हणजे दुःखाचे निवारण करण्याचे कारण हनुमंत ठरले म्हणून त्यांना हे नाव देण्यात आले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com