Dhanteras 2022: 'हे' भन्नाट संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात.
Dhanteras 2022
Dhanteras 2022Esakal

दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. 

यंदा कधी आहे धनत्रयोदशी?

हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे, तर रविवार, 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:44 वाजता त्रयोदशी तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभते अशी प्रथा आहे. या दिवशी यमापासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी यमदीपदान करण्याचीही पद्धत आहे. अशा या मंगल दिवशी तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

Dhanteras 2022
Diwali 2022 : दिवाळीत 'हे' तेल टाकून लावा दिवे ; होतील अनेक शुभ लाभ

1) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

2) आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

3) धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Dhanteras 2022
Diwali 2022: उटणे लावण्याचे काय आहे फायदे?

4) धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

5) लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

6) धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dhanteras 2022
Diwali 2022: दिवाळी आलीय हा संदेश देणारी कराष्टमी पूजा, कशी करतात ? जाणून घ्या

7) दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

8) धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

9) धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

10) माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे… यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dhanteras 2022
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

11) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

12) आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

13) धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Dhanteras 2022
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल घरच्या घरी कंदी पेढा कसा तयार करायचा?

14) धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

15) लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

16) धनत्रयोदशीच्या मंगल दिनी, व्हावी बरसात धनाची, साधून औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनाची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Dhanteras 2022
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

17) धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शोर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत तुमच्यावर लक्ष्मीचा वर्षावर करो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

18) दारी दिव्यांची आरास, अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, हर्षून गेले मन, आला आला दिवाळीचा सण, करा प्रेमाची उधळण…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

19) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद आणि नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2022
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

20) दिपावली व धनत्रयोदशीनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छाधन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

21) दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा !

22) दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dhanteras 2022
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

23) दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो… हिच इच्छा. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा !

24) दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी… घरी नांदू दे सुख समृद्धी….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा ! 

25) पहिला दिवा आज लागेल दारी, सुखाचा किरण येईल तुमच्या घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा… तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com