Holi Astrology : होळी ते गुढीपाडवा, 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा l Holi Astrology March 2023 Lucky Zodiac Signs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Astrology

Holi Astrology : होळी ते गुढीपाडवा, 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

March 2023 Lucky Zodiac Signs : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचं एका राशीतून दुसऱ्या राशीत सतत स्थानांतर होतच असतं. त्यानुसार ग्रहांच्या या गोचरमुळे काही शुभ योग घडतात तर काही अशुभ योग घडत असतात. त्यानुसार होळी ते गुढीपाडव्या दरम्यान मंगळ ग्रह मिथुन राशीत, शुक्र मेष राशीत, सुर्यदेव मीन राशीत, त्याच्या दुसऱ्या दिवशी बुध पण मीन राशीत प्रवेश करणार आहे.

मार्च महिन्यात होळी, चैत्र नवरात्री, गुढीपाडवा असे शुभयोग तयार होत आहेत. यामुळे काही राशींसाठी प्रचंड शुभ काळ सुरु होत असून त्यांना बक्कळ पैसा कमवण्याचा योग दिसत आहे.

वृषभ - या राशीच्या लोकांना मार्च महिन्यात करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घ्याल त्या यसस्वी होतील. आर्थिक मिळकतीचे मार्ग वाढतील. प्रेमाची साथ लाभेल. जुन्या आजार बरे होतील. विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग आहेत.

कन्या - नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. धनलाभ होऊ शकतो. मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात. जोडिदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

तूळ - मार्चच्या सुरुवातीला तूळ राशीच्या भाग्यात आर्थिक प्रगतीचे योग आहेत. होळीच्या आधीच तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्या कामावर निढळ श्रद्धा ठेवणं महत्वाचे आहे. काही महत्वाच्या गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील. जोडिदाराकडून मोठं सरप्राइज मिळेल.

धनु - या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना आनंदाचा व अनुकूल असणार आहे. करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. प्रॉपर्टी गुतवणूकीचा प्रबळ योग आहे. येत्या काळात पैसे कमवण्याची संधी आहे. गुढीपाडव्या आधीच तुम्हाला नव्या गुतवणुकीची मोठी संधी मिळेल. सतर्क राहून निर्णय घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.