

Rashifal marathi dhan yog,
Sakal
Astrological Prediction: ग्रह कधीही स्थिर राहत नाहीत आणि त्यांच्या भ्रमणादरम्यान सतत गतिमान असतात. या हालचालींमुळे ते विविध योग, युत तयार करतात. याचा १२ राशींच्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो. 23 जानेवारी 2026 रोजी, सूर्य आणि यम ग्रह शून्य अंश अंतरावर असतील आणि एक विशेष युती तयार करतील. हिंदू धर्मात, यमाला सूर्यपुत्र मानले जाते आणि तो सजीवांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा न्याय करतो, म्हणूनच त्याला धर्मराज असेही म्हणतात. या युतीचा प्रभाव अत्यंत शुभ राहणार आहे. या युतीमुळे पुढील ३ राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.