Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या या 3 कृष्ण लीला तुम्हाला माहिती का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janmashtami

Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या या 3 कृष्ण लीला तुम्हाला माहिती का?

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे.आणि शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो.

भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आणि त्यांच्या बालक्रिडा अप्रतिम आहेत. भगवान विष्णूचा अवतार मानले जाणारे श्री कृष्ण 16 कलांनी संपन्न आहे. श्री कृष्णाच्या बालपणीची खोडकर शैली आणि त्यांचे अनोख्या लिला सर्वांनाच भुरळ घालत असे. चला तर मग या माखन चोर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातील तिन वेगवेगळ्या लिलाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

हेही वाचा: Krishna Janmashtami recipe: मखान्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

कारागृहातील लीला...

भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात माता देवकीच्या पोटी झाला. वासुदेव आणि देवकीच्या सात लेकरांना कंसाने आधीच मारले होते. कंसाचा वध करण्यासाठीच भगवान विष्णूने कृष्ण म्हणून जन्म घेतला. आणि कृष्णाचा जन्म होताच तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि तेव्हाच आपोआप सगळे पहारेकरी गाढ झोपी गेले. ही होती बाल गोपाळांची लीला. यानंतर त्याचे वडील कृष्णाला रात्रीतून नांदगाव येथे घेऊन गेले होते.

हेही वाचा: Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीला घरी दही लावताय मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पुतना राक्षसीनीला ठार मारले...

बालकृष्ण जिवंत असल्याचे कंसाला कळल्यावर त्याने कृष्णाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसीनीला पाठवले. पूतना वेश धारण करून कान्हाला तिच्या वक्षस्थळावर विष लावून दूध देऊ लागली, पण बाल गोपाळांचा महिमा इतका विलक्षण आहे की तिने पूतनाचे खरे रूप ओळखले. आणि बालकृष्णाने पूतनाचा जीव घेतला. अशा प्रकारे कान्हाने पुतना राक्षसीनीला ठार मारले. त्यावेळी बाल कृष्णाच्या या लीला पाहून अनेकजण थक्क झाले होते.

हेही वाचा: Krishna Janmashtami: श्रीकृष्णाने खरंच आपल्या सोळा हजार राण्यांशी लग्न का केले होते?

आता बघू या कालिया नाग कथा

जेव्हा बालकृष्णाच्या बालक्रिडेत करमणुकीचा उल्लेख येतो तेव्हा कालिया नागाचे नाव नक्की घेतले जाते. कंसाने भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पुढे अचानक कालिया नागाने यमुना नदीत तळ ठोकला आणि कालिया नागाच्या विषामुळे यमुना नदीचे सगळे पाणी काळे झाले होते. या विषाच्या पाण्यामुळे अनेक पशू-पक्षी मरू लागले होते. कृष्ण एकदा नदीच्या काठावर आपल्या मित्रांसोबत चेंडू फळी खेळत असताना अचानक चेंडू बालकृष्णा कडून यमुनेत गेला. आणि सहजरित्या कृष्णाने चेंडू आणण्यासाठी नदीत उडी मारली.कृष्णाने उडी मारताच क्षणी कालिया नाग खवळला, पुढे बालकृष्णात आणि कालिया नाग यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले.

शेवटी कालिया नाग समजून चुकले की हा कुणी सामान्य बालक नाही आहे. त्यामुळे विषारी कालिया नाग बालकृष्णा समोर नतमस्तक झाला. आणि कालिया नतमस्तक होताचं बाल कृष्ण कालिया नागाच्या फण्यावर नाचू लागला.

Web Title: Janmashtami 2022 Do You Know These 3 Krishna Lilas Of Lord Krishna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..