
कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंदोत्सव. भारतातील अनेक सणांपैकी असा हा सण अतिशय महत्त्वाचा हिंदू सण मानला जातो. भगवान विष्णूच्या आठव्या अवताराची जयंती म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. यंदा ही ५२५२वी जयंती असेल. या पावन दिवशी उपवास, भजन-कीर्तन, मंदिरांतील पूजा-अर्चा आणि दहीहंडी सारखे सोहळे मोठ्या श्रद्धेने पार पडतात. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये कृष्ण जन्माष्टमी दोन दिवस पाळली जाणार असून, त्यामुळे भक्तांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.
यंदाच्या जन्माष्टमीला खूप विशेष आणि दुर्मिळ ग्रहयोग घडणार आहेत. जवळपास १९० वर्षांनंतर असा संयोग होत आहे. यापूर्वी सन १८३५ मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी अशाच शुभ योगांची निर्मिती झाली होती. विशेष म्हणजे त्या वेळीही आणि आता यावर्षीही जन्माष्टमी १६ ऑगस्ट रोजीच आहे.