

January 2026 Planetary Transit:
Sakal
January 2026 planetary transit astrology prediction: नवीन वर्षाची सुरुवात ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठ्या बदलांसह होणार आहे. नवीन वर्षातील पहिला महिना म्हणजेच जानेवारी हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या काळात एकाच वेळी चार प्रमुख ग्रहांचे संक्रमण होईल. 2026 वर्षाचा पहिला महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. या महिन्यात सूर्यासोबतच मंगळ, बुध आणि शुक्र देखील त्यांच्या राशी बदलतील, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर होणार आहे.