या पाच वाईट सवयीमुळे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकणार? लक्ष्मीचा होईल कोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unlucky

या पाच वाईट सवयीमुळे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकणार? लक्ष्मीचा होईल कोप

माणसाच्या आयुष्यात काहीही वाईट घडले तर तो आपल्या नशिबाला दोष देतो पण मुळात प्रत्येक वाईट घडणाऱ्या गोष्टीमागे नशिबापेक्षा आपल्या वाईट सवयीच जास्त जबाबदार असतात. ज्योतिषाचार्य शैलेंद्र पांडे यांनी आपल्यासोबत वाईट घडणाऱ्या गोष्टींमागे आपल्या वाईट सवयी कशा जबाबदार असतात आणि त्या वाईट सवयी कोणत्या याविषयी सांगितले. त्यातील काही खालील प्रमाणे- (know how our bad habit makes us unlucky check here details)

हेही वाचा: गांधीजींनी अनुभवला ‘रामराजा’

नखे चावणे- अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोकांना नखे चावण्याची खूप वाईट सवय असते. ज्योतिषाच्या मते, नखे चघळल्याने नशिबावर वाईट परीणाम होतो.ज्यामुळे आपल्याला अपयश मिळते. आणि समाजात निंदेची पातळी वाढते.

विखुरलेले शूज आणि चप्पल- जे लोक घरात शूज आणि चप्पल विखुरलेले ठेवतात त्यांच्या नशिबावर वाईट परिणाम होतो. असे केल्याने जीवनात अनावश्यक धावपळ वाढते. ज्या कामासाठी एवढी धावपळ केली जाते, त्यातही यश मिळणे माणसाला अवघड होऊन बसते.

हेही वाचा: पंचांग 31 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

घराभोवती अस्वच्छता- ज्योतिषी सांगतात की घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला घाण पसरल्याने कुंडलीत शुभ योग बिघडतात. सोबतच अस्वच्छता पसरल्याने जीवनातील शुभ योग्य नष्ट होते. त्यामुळे जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

विखुरलेले स्वयंपाकघर - अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोकांचे स्वयंपाकघर खूप विखुरलेले असतात.त्यामुळे भांडी किंवा इतर कोणतेही गोष्टी स्वयंपाकघरात विखुरलेल्या ठेवू नयेत. असे केल्याने घरात खर्च वाढतो आणि पैसा हातात येत नाही.

पाय घासून चालणे - काही लोकांना पाय घासून चालण्याची वाईट सवय असते.असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात अनावश्यक तू-तू मैं-मैं वाढतो. म्हणूनच नेहमी पाय वर करून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Web Title: Know How Our Bad Habit Make Us Unlucky Check Here Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top