Diwali : लक्ष्मीपूजनावेळी 13 ठिकाणी लावावा एक तरी दिवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali : लक्ष्मीपूजनावेळी 13 ठिकाणी लावावा एक तरी दिवा

Diwali : लक्ष्मीपूजनावेळी 13 ठिकाणी लावावा एक तरी दिवा

Diwali Laxami Pooja Tips : आज संध्याकाळी मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. त्यासाठी सगळीकडे जोरदार तयारीदेखील केली जात आहे. यादिवशी घरात आणि घराबाहेर दिवे लावण्याची परंपरा आहे.

हेही वाचा: Diwali 2022: नरकासूराच्या दहनानंतर अंघोळ अन् मग नाश्ता, वाचा काय आहे अनोखी परंपरा

लक्ष्मी पूजा करताना देवी लक्ष्मीसमोर तुपाचा आणि तेलाचा दिवा लावावा, डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा. लक्ष्मीपूजनासोबतच दिव्याचीही पूजा करावी. घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुदोष संपुष्टात येतात. दिव्याचा प्रकाश देवतांना खूप आवडतो, म्हणूनच पूजेत दिवा लावणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: Diwali Lakshmi Pujan : लक्ष्मीपुजन करताना 'या' गोष्टी विसरू नका, देवी होईल प्रसन्न

तुपाच्या दिवा लावताना पांढर्‍या सुती वातींचा वापर करावा. लाल धाग्याचा दिवा तेलाच्या दिव्यासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. पूजेत तुटलेले किंवा फुटलेले दिवे लावू नयेत. लक्ष्मी पुजनावेळी या ठिकाणी दिवे लावल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि घरात सुख-समृद्धी राहते.

हेही वाचा: Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ

कोणत्या ठिकाणी लावाल दिवा

 • घराच्या अंगणात दिवा लावावा.

 • आंगण नसेल तर, तुम्ही घरातील मध्य खोलीत दिवा लावू शकता.

 • देवघरात कमीत कमी ५ दिवे लावावे.

 • तुळशीपाशी दिवा लावावा.

 • चार दिवे असे लावावे ज्यात ४ वाती लावल्या जातील. हे दिवे घराच्या चारही बाजूंना लावावे.

 • स्वयंपाघरात दिवा लावावा.

 • घराच्या आसपास असलेल्या मंदिरात

 • घरात पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावावा.

 • नदी अथवा तलावाजवळ दिवा लावावा.

 • घराच्या छतावर दिवा लावावा.

 • घरात ज्या ठिकाणी धन ठेवले जाते तेथे अगदी सावधतेने दिवा लावावा.

 • कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावावा.

  डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Diwali Festival