

Holika Dahan 2026 Horoscope
esakal
Astrology prediction holika dahan 2026 : होलिका दहन हा केवळ वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण नसून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा काळ मोठ्या ऊर्जा परिवर्तनाचा मानला जातो. यंदाची होळी काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. ग्रहांची बदलती चाल आणि नक्षत्रांची शुभ स्थिती यामुळे जुन्या आर्थिक समस्या संपुष्टात येतील. अग्नीच्या या पवित्र उत्सवानंतर नकारात्मकता जळून खाक होईल आणि तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. विशेषतः तीन राशींच्या नशिबात मोठी लॉटरी लागण्याचे संकेत आहेत.