

marathi horoscope 28 february lucky zodiac signs
esakal
28 february 2026 Astrology Updates : येत्या 28 फेब्रुवारीपासून अवकाशात ग्रहांची एक अशी दुर्मिळ चक्राकार स्थिती निर्माण होत आहे, ज्याला 'धनदौलत योग' मानले जाते. या दिवशी शुक्र आणि गुरूची शुभ दृष्टी नवपंचम योगातून जात असल्याने ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होणार आहे. हा काळ केवळ आर्थिक वृद्धीचा नसून ज्यांच्या कुंडलीत ग्रहांची साथ नव्हती त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरेल. विशेषतः पाच राशींसाठी हा 'गोल्डन पीरियड' असून त्यांच्या जीवनात नोकरी, पैसा आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.