

Magh Gupt Navratri 2026 starts January 19 with powerful planetary alignments. Four zodiac signs get wealth, promotion, and success
esakal
Magh Navratri Astrology Prediction : आज म्हणजेच १९ जानेवारीपासून माघ गुप्त नवरात्रीला प्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही नवरात्र अत्यंत फलदायी मानली जाते, कारण या काळात ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आणि लाभदायक बनत आहे. या नऊ दिवसांत शक्तीच्या १० महाविद्यांची उपासना केली जाते, ज्यामुळे साधकावर देवीची विशेष कृपा राहते. यंदाच्या गुप्त नवरात्रीत ग्रहांच्या विशेष युतीमुळे ४ राशींच्या व्यक्तींसाठी 'राजयोग' सदृश स्थिती निर्माण होत असून त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत.