Maghi Ganesh Jayanti : गणपती बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त आवडतात 'हे' खास पदार्थ; माघी गणेश जयंतीला दाखवा नैवेद्य

गणपती बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त आवडतात 'हे' खास पदार्थ...
Maghi Ganesh Jayanti : गणपती बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त आवडतात 'हे' खास पदार्थ; माघी गणेश जयंतीला दाखवा नैवेद्य

दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा 13 फेब्रुवारीला म्हणजेच आज माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. तसेच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात.

बाप्पाला गोड पदार्थ किती आवडतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मोदक हे गणपती बाप्पाचे खूप आवडते असले तरी या व्यतिरिक्त आणखी काही पदार्थ आहेत, जे गणपती बाप्पाला खूप आवडतात.

श्रीखंड

श्रीखंड हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थ आहे. दही, साखर, वेलची आणि केशर यांच्या मिश्रणातून श्रीखंड बनवले जाते. बाप्पाला श्रीखंडाचा नैवेद्य फार आवडतो.

मोतीचूर लाडू

मोतीचूर लाडू हा बाप्पाच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. मोतीचूर लाडू बेसन, साखर, तूप, वेलची आणि काजू इत्यादीपासून बनवले जातात. त्यासाठी छोटी बुंदी लागते.

पुरण पोळी

घरच्या घरी तुम्ही हा नैवेद्य बनवून बाप्पाला अर्पण करू शकता, पुरण पोळी ही हरभरा डाळ, वेलची, गूळ आणि तुपापासून तयार केली जाते. पुरण पोळी हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे. 

नारळाचा भात 

गणपती बाप्पाला नारळाचा भात देखील खूप आवडतो. नारळाच्या दुधात भात शिजवून हा पदार्थ तयार केला जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गूळ किंवा साखरही घालू शकता.

शिरा

बाप्पाला शिऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तुम्ही केळी मॅश करुन स्पेशल शिरा बनवू शकता. सत्यनारायणाच्या पूजेत बनतो अगदी तसा हा शिरा बनेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com