

Maha Shivratri Zodiac Prediction 2026:
Sakal
Golden time zodiac signs on Mahashivratri: महाशिवरात्री हा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जाणारा एक पवित्र हिंदू सण आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास महत्व आहे. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. या वर्षी महाशिवरात्री ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरेल. खरं तर, महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या तारखेला सौभाग्याचा कारक शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत असतील. दोन्ही ग्रहांचा युती या राशीत होईल, ज्यामुळे शुक्रादित्य योग निर्माण होईल. परिणामी, महाशिवरात्रीला शुक्रादित्य योगाचा दुर्मिळ संयोग प्रबळ होईल. या प्रभावामुळे पुढील ३ राशीच्या लोकांवर भोलेनाथाची कृपादृष्टी असणार आहे.