

Mercury Transit 2027: Lucky Signs in Capricorn
esakal
Astrology: नवीन वर्ष 2027 च्या सुरुवातीलाच ग्रहांच्या हालचालींमध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. यामध्ये बुद्धी, संवाद कौशल्य, वाणी, शिक्षण, व्यापार आणि आर्थिक बाबींचा कारक मानला जाणारा बुध ग्रह धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवर तसेच जागतिक घडामोडींवरही पडण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तवली जाते.
दृक पंचांगानुसार, बुध 10 जानेवारी 2027 ला पहाटे 12 वाजून 39 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल आणि 28 जानेवारीपर्यंत याच राशीत कायम राहील. त्यानंतर तो कुंभ राशीत जाईल. चंद्र राशीच्या आधारे केलेल्या या फलादेशानुसार, बुधाच्या मकर राशीतील गोचराचा विशेष फायदा कोणत्या राशींना मिळू शकतो, ते पाहूया.