esakal | अंबाजोगाईत घटस्थापनेने योगेश्वरीच्या नवरात्रोत्सव सुरु |Navratra Ustav
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाजोगाई (जि.बीड) : योगेश्वरीच्या मंदिरात गुरुवारी (ता.सात) सकाळी दहा वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला  प्रारंभ झाला.

अंबाजोगाईत घटस्थापनेने योगेश्वरीच्या नवरात्रोत्सव सुरु

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

,

अंबाजोगाई (जि.बीड) : योगेश्वरीच्या मंदिरात गुरुवारी (ता.सात) सकाळी दहा वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratra Ustav) प्रारंभ झाला. तहसीलदार विपीन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक महापुजा होऊन घटस्थापना झाली. याच दिवशी दीड वर्षानंतर हे मंदिर खुले झाल्याने भाविकांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व तीर्थक्षेत्र असलेल्या (Ambajogai) योगेश्वरी देविला कुमारिका देवी म्हणून ओळखले जाते. या देवीचे वर्षातून दोन नवरात्रोत्सव साजरे होतात. त्यात हा अश्विन महिन्यातील उत्सव दसरा महोत्सव व मार्गशीर्ष महिन्यात प्रमुख नवरात्रोत्सव (Beed) साजरा होतो. यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमेला मंदिर परिसरात यात्राही भरत असते.

हेही वाचा: IPL 2021: चेन्नई वि. कोलकाता ‘काँटे की टक्कर?’

घटस्थापना

या नवरात्रोत्सवात गुरुवारी सकाळी नऊ वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात घटस्थापना झाली. तहसीलदार तथा देवल समितीचे अध्यक्ष विपीन पाटील व त्यांच्या पत्नी रेणुका पाटील यांच्या हस्ते महापुजा व आरती झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, देवल समितीचे सचिव ॲड. शरद लोमटे, विश्वस्त गिरधारीलाल भराडिया, उल्हास पांडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, भगवानराव शिंदे, प्रा. अशोक लोमटे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, गौरी जोशी, संध्या जाधव, पुजा कुलकर्णी, सारंग पुजारी यांच्यासह मानकरी, तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

दर्शनासाठी भाविकांची ओढ

कोरोनाच्या निर्बंधामुळे योगेश्वरीचे मंदिर बंद असल्याने भक्तांना मुख्यव्दाराच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घ्यावे लागत होते. गुरुवारी मंदिर खुले झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परंतू देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसल्याने भाविकांना मुख दर्शन घ्यावे लागले.

हेही वाचा: आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका

loading image
go to top