Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती
Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!

घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नसतो, पण ज्यांना मुहूर्तावर घट बसवायचे आहेत ते त्यादिवशी सकाळी 6-32 पासून म्हणजेच सूर्योदयापासून प्रतिपदा समाप्तीपर्यंत म्हणजे दुपारी 1-47 पर्यंत कधीही घटस्थापना करू शकतात, असे पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!
Navratri 2021 : देवीची नऊ रूपं अन् नऊ रंग

यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.

Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!
World Coffee Day मूड फ्रेश करण्यासाठी हवी कॉफी

नऊ दिवसांचे महत्व

‘ नऊ ‘ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो, असे सोमण यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com