नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता 'या' नागरिकांना घेता येणार यल्लम्मा देवीचं थेट दर्शन

नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) काळात सौंदत्ती डोंगरावर यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सुमारे दहा लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
Saundatti Yellamma Temple
Saundatti Yellamma Temple esakal
Summary

शासनाने बजाविलेल्या आदेशानुसार सौंदत्ती डोंगरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात (Saundatti Yellamma Temple) अखेर ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी फलक लावण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभारावे लागणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना थेट देवीचे दर्शन घडणार आहे.

Saundatti Yellamma Temple
पुरोगामी विचारांचा नेता हरपला! जनता दलाचे नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचं निधन; गडहिंग्लजमध्ये आज अंत्यसंस्कार

नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) काळात सौंदत्ती डोंगरावर यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सुमारे दहा लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. या अंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुलभरित्या देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Saundatti Yellamma Temple
Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून आदिशक्तीचा जागर; उत्सवकाळात 'असा' चालणार महापूजेचा कार्यक्रम

देवीच्या दर्शनाला कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या होणाऱ्या प्रचंड गर्दीकडे लक्ष देत सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. शासनाने तीन महिन्यांपूर्वीच राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करावी, असे आदेश बजाविले होते. मात्र, सौंदती मंदिरामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नाही.

याबाबत ‘सकाळ’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करत याकडे लक्ष वेधले होते. भाविकांनीही मंदिर प्रशासनाकडे तशी मागणी केली होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील भाविकांना देवीच्या दर्शनासाठी एक विशेष खिडकीद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

Saundatti Yellamma Temple
Navratri 2023 : 'ती' उभीये सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय! सर्व बंधनं झुगारत पुरुषाच्या बरोबरीनं दाखवतेय महाराष्ट्राला आपलं सामर्थ्य

ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा दाखला, आधारकार्ड संबंधित काऊन्टरवर दाखविल्यास देवदर्शन घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासंदर्भात मंदिराजवळ माहिती फलकही लावण्यात आलेला आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सौंदती मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Saundatti Yellamma Temple
Navratri Festival : अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत अवजड वाहनांना बंदी; 'या' मार्गांत केला मोठा बदल

शासनाने बजाविलेल्या आदेशानुसार सौंदत्ती डोंगरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात आली असून, वयाचा दाखला दिल्यानंतर दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.

-एस. बी. पी. महेश, कार्यकारी अधिकारी, यल्लम्मा मंदिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com