पुरोगामी विचारांचा नेता हरपला! जनता दलाचे नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचं निधन; गडहिंग्लजमध्ये आज अंत्यसंस्कार

शिंदे यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Former MLA Shripatrao Shinde Passed Away
Former MLA Shripatrao Shinde Passed Awayesakal
Summary

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.

गडहिंग्लज : जनता दलाचे (JDS) माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष व गडहिंग्लजचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव दिनकरराव शिंदे (वय ८७) यांचे निधन झाले. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Former MLA Shripatrao Shinde Passed Away
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंत्रिपदाची 'पहिली माळ' मकरंद आबांच्या गळ्यात? साहेबांच्या बालेकिल्ल्यात दादांची हवा!

काल (शनिवार) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांनी (Shripatrao Shinde) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज (ता. १५) सकाळी सातपर्यंत गडहिंग्लजला (Gadhinglaj) आणले जाणार आहे.

Former MLA Shripatrao Shinde Passed Away
Success Story : सेवानिवृत्त दाम्पत्यानं 70 एकरात कातळावर फुलवली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; राजापुरात पहिलाच प्रयोग, तब्बल 3 लाखांचं उत्पन्न

येथील निवासस्थानी सकाळी नऊपर्यंत, तर त्यांच्या नूल या मूळ गावी सकाळी अकरापर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे. त्यानंतर भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात दुपारी बारा वाजता अंत्यविधी केला जाणार आहे. अॅड. शिंदे यांच्या मागे पत्नी ऊर्मिला, कन्या डॉ. रचना थोरात (कऱ्हाड) व माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, चार भाऊ, बहीण, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे ते मेहुणे होत. अॅड. श्रीपतराव शिंदे यांचे नूल (ता. गडहिंग्लज) मूळ गाव. ते वकिली व्यवसायाच्या निमित्ताने ते गडहिंग्लजला स्थायिक झाले. आंदोलनातून तयार झालेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे आले होते. त्यांनी १९८५ ते १९९५ या काळात दोनदा गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गडहिंग्लज साखर कारखान्याचे तब्बल २२ वर्षे अध्यक्ष होते.

जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसले. विरोधकांच्या टीकेची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागातील सामान्यांच्या शिक्षणाची दारे खुली केलेले त्यांचे वडील दिनकरराव शिंदे मास्तरांच्या संस्कारात व राष्ट्र सेवादलात त्यांची जडणघडण झाली. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजवादी विचारांची कास सोडली नाही.

सुरुवातीला त्यांनी काही काळ माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजातील विषमतेवर प्रहार, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एस. टी., नगरपालिका, साखर कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि वंचितांच्या प्रश्नावर त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. ऑगस्टमध्येच त्यांच्या नेतृत्वाखाली महागाई, शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर काढलेला मोर्चा त्यांचा अखेरचा ठरला.

Former MLA Shripatrao Shinde Passed Away
Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

अॅड. शिंदे महिनाभरापूर्वी बाथरूमध्ये पाय घसरून पडले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविले होते. चार-पाच दिवसांनंतर ते उपचारांना चांगला प्रतिसादही देत होते. प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, आज सकाळपासून त्यांचा रक्तदाब खालावण्यास सुरवात झाली. त्यातच हृदयविकाराचा धक्क्याने सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली.

नगरसेवक ते आमदार...

श्रीपतराव शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात १९५६ मध्ये समाजवादी पक्षातून झाली. त्यानंतर त्यांनी १९७४ मध्ये गडहिंग्लज नगरपरिषदेची निवडणूक लढविली. पालिका शिक्षण मंडळाचे ते पहिले सभापती झाले. त्यानंतर ते १९८५ मध्ये कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात डॉ. एस. एस. घाळी यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. १९९० मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत बाबा कुपेकर यांना पराभूत केले. तालुक्यात कॉंग्रेसची ताकद असतानाही केवळ सर्वसामान्य़ांच्या पाठबळावर या दोन्हीवेळी आमदारपदी निवडून येत इतिहास रचला.

Former MLA Shripatrao Shinde Passed Away
वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी राजवाड्यातील मोठ्या चोरीचा सांगितला इतिहास, नेमकं काय घडलं?

१९८८ पासून त्यांनी गडहिंग्लज साखर कारखान्याची सलग निवडणूक लढविली. २२ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले. एकूण राजकीय कारकिर्दीत त्यांनी आठवेळा विधानसभा, एकदा लोकसभा, दोन वेळा जिल्हा परिषद, एकदा विधानपरिषद निवडणूक लढविली. राजकारणात वाटचाल करतानाच गडहिंग्लज उपविभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालय सुरू केले. अलीकडेच त्यांनी राधाबाई शिंदे फार्मसी महाविद्यालय, रचना पब्लिक स्कूलची स्थापना केली.

जनता दलाचे अस्तित्व टिकविले...

गेल्या दोन दशकांपासून राज्यात जनता दलाची वाटचाल खडतर होत राहिली. अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने गडहिंग्लज नगरपरिषद व गडहिंग्लज साखर कारखान्यावर सत्ता कायम ठेवली. जिल्हा पातळीवरील विधान परिषद, जिल्हा बँक, गोकुळ दूध संघासह अन्य सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला वगळून राजकारण करणे अडचणीचे ठरत होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com