New Year 2023 Predictions: नव्या वर्षाच्या प्रत्येक महिन्यात नवी घडामोड, कुठे राजकारण तापणार तर कुठे युद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year 2023 Predictions

New Year 2023 Predictions: नव्या वर्षाच्या प्रत्येक महिन्यात नवी घडामोड, कुठे राजकारण तापणार तर कुठे युद्ध

New Year 2023 Predictions: नव्या वर्षाला सुरूवात झाली असून या वर्षात ग्रहांच्या स्थितीत महत्वपूर्ण बदल दिसून येणार आहे. या वर्षात शनि कुंभ राशीत तर ऑक्टोबरपर्यंत राहू मेष व केतु तूळ राशीत राहाणार आहे. मानवी जीवनावर या तीन ग्रहांचा जास्त प्रभाव असतो. २०२३ हे वर्ष जगात प्रत्येक महिन्यात काय परिणाम देणार आहेत ते आपण जाणून घेऊया.

जानेवारी - या महिन्यात शनिचं राशी परिवर्तन होणार आहे. यावेळी देश आणि जगात मोठमोठे बदल होणार आहे. इन्फेक्शनचा धोका वाढेल. सोबतच जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जगात अशांतताही पसरू शकते. (Maharashtra Politics)

फेब्रुवारी - या महिन्यात शुक्राचा प्रभाव दिसून येईल. लोकांच्या आरोग्यामध्ये बदल होईल. आरोग्य सुधारेल. या महिन्यात देशात मोठा राजकीय बदल घडू शकतो. या महिन्यात नैसर्गिक संकट आणि युद्धाची परिस्थितीही दिसून येईल.

मार्च - या महिन्यात शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील. महागाईतही घट दिसून येणार. या महिन्यात आर्थिक घोटाळेही पुढे येतील. युद्धासारखी तणावपूर्ण स्थिती जगाला प्रभावित होईल.

एप्रिल - सूर्यदेवाच्या कृपेने या महिन्यात जगात परिवर्तन घडून येईल. मोठ्या राजकारण्यांवर या महिन्यात संकट ओढवेल. या महिन्यात रेल्वे दुर्घटना आणि वायू दुर्घटनांचीही शक्यता दिसून येईल. युद्ध आणि प्राकृतिक संकटांचीही स्थितीही दिसून येईल.

मे - सूर्याचा प्रभाव या महिन्यात ताण थोडा कमी करेल. लोकांना महागाई आणि आजारांपासून सुटका मिळेल. सामान्य माणसांच्या नशीबात आर्थिक वृद्धी आणि सुखाचे योग दिसून येतील.

जून - या महिन्यात देश आणि जगपातील परिस्थिती सामान्य होईल. मात्र भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे.

जुलै - हा महिनादेखील दुर्घटनांचे संकेत देणारा ठरणार आहे. मात्र या महिन्यात लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधार होईल. रियल इस्टेटच्या क्षेत्रातही सुधार होईल. या महिन्यात आर्थिक व्यवहारात दक्षता घ्यावी.

ऑगस्ट - बुध ग्रहाच्या प्रभावाने या महिन्यात अर्थ जगतात मोठे बदल घडून येतील. ऑटोमोबाईल आणि कम्युनिकेशन सेक्टरमध्ये वेगाने प्रगती झाली.

हेही वाचा: New Year Celebration: कुठे खुर्च्यांवर उड्या तर कुठे पुढाऱ्यांच्या पुतळ्याचं दहन, जगभरातल्या विचित्र प्रथा

सप्टेंबर - या महिन्यात लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील. कर्ज आणि आर्थिक समस्यांपासून लोकांना दिलासा मिळेल.

ऑक्टोबर - बुधच्या प्रभावाने या महिन्यात आर्थिक जगतात मोठे बदल घडून येतील. विवाह आणि बाळाची गोड बातमी मिळू शकते. या महिन्यात मोठा न्यायालयीन निर्णय येऊ शकतो.

नोव्हेंबर - या महिन्यात अनेक वादांपासून सुटका होईल. लोकांच्या जीवनात प्रगती होईल. या महिन्यात क्रिडा क्षेत्रात महत्वाच्या घडामोडी दिसून येतील. देशातील परिस्थिती सामान्य असेल.

डिसेंबर - या महिन्यात मोठे राजनितिक बदल घडून येतील. शेअर बाजार आणि मौल्यवान धातूंमध्ये उतार चढाव दिसून येतील. या काळात शिक्षणासंबंधीच्या नियमांत बदल घडून येतील.