

Guru of Saint Dnyaneshwar: Sant Nivruttinath
esakal
Saint Nivruttinath’s Story: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भाऊ आणि गुरू म्हणजेच 'संत निवृत्तीनाथ'. निवृत्तीनाथ हे फक्त ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ नव्हते, तर ते त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक आणि संपूर्ण कुटुंबाचा आधारवड होते. त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास आजही वारकरी संप्रदायात प्रेरणादायी ठरतो.
संत निवृत्तीनाथांचा जन्म साधारणपणे १२६८ किंवा १२७३ (इ.स.चे १३ वे शतक) च्या सुमारास झाला. त्यांच्या बालपणीची एक अद्भुत घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
एकदा विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गेले असताना तिथे अचानक एका वाघाने हल्ला केला. वाघाच्या भीतीने सर्व कुटुंब सैरावैरा पळाले. या गडबडीत बाल निवृत्तीनाथ एका गुहेत आश्रयाला गेले. त्या अंधाऱ्या गुहेत नाथ संप्रदायातील महान योगी श्री गहिनीनाथ ध्यानस्थ बसले होते.
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांमधील सात्विक आणि भाविक गुण ओळखून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांनी निवृत्तीनाथांना योगाचे ज्ञान दिले आणि "जगातील दुःखी जीवांचे कल्याण कर," असा आदेश देऊन जनसेवेसाठी प्रेरित केले.