Festival Month : यंदा ऑक्टोबर ठरणार सणावारांनी भरगच्च महिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Festival Month

Festival Month : यंदा ऑक्टोबर ठरणार सणावारांनी भरगच्च महिना

Important Days and Dates in October : ऑक्टोबर महिना सणावारांनी भरलेला आहे. लॅटीन मध्ये "Octo" म्हणजे आठ. त्यावरून ऑक्टोबर असे नाव देण्यात आले आहे. ई.स.वी. पूर्व १५३ पर्यंत रोमन कॅलेंडरमध्ये ऑक्टोबर हा आठवा महिना होता.

हेही वाचा: Bail Pola 2022: बैलपोळा सण साजरी करण्याची पारंपरिक पद्धत कशी आहे?

संपूर्ण देशात सर्वच सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक साणाला-दिवसाला विशेष महत्व आहे. इथे आम्ही तुम्हाला या सर्व खास दिवसांची यादी आणि महत्व देत आहोत.

हेही वाचा: दिवे येथे मोहरम सण उत्साहात साजरा

१ ऑक्टोबर - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, सर्व वयोगटासाठी विकास निदर्शित करण्यासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली यांनी १ ऑक्टोबर हा जीगतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जाहिर केला.

याच दिवशी जागतिक कॉफी दिवस व जागतिक शाकाहारी दिवस म्हणूनही १ ऑक्टोबर साजरा केला जातो.

हेही वाचा: मोदींनी कर्मचाऱयांच्या मुलींकडून राखी बांधून रक्षाबंधनाचा सण केला साजरा

२ ऑक्टोबर - गांधी जयंती

या दिवशी महात्मा गांधींची जयंती साजरी होते. ते जगातील प्रसिध्द नेता होते. त्यानिमित्तच या दिवसाला जागतिक अहिंसा दिवस म्हणूनपण साजरे केले जाते. अहिंसेचा प्रटार प्रसार व्हावा या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.

हेही वाचा: सण आयलाय गो... नारळी पुनवेचा

३ ऑक्टोबर - जागतिक प्राणी सुरक्षा दिवस

प्राण्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरुकता वाढावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. प्राण्याच्या सूरक्षिततेचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.

हेही वाचा: पवित्र मोहरम पर्व : विविध धार्मिक कार्यक्रमांनी आशूरा सण साजरा

५ ऑक्टोबर

दसरा - विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

हेही वाचा: नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

धम्मचक्र प्रवर्तन दिन - हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी दसऱ्याला दिक्षा बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धर्मचक्र अनुवर्तनदिनी नागपूरला जातात. उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता.

८ऑक्टोबर - भारतीय वायूसेना दिवस

संपूर्ण भारतात हा दिवस भारतीय वायूसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरूवात १९३२ मध्ये झाली.

९ ऑक्टोबर

जागतिक टपालदिन - टपाल खात्याविषयी जागरूकता वाढावी म्हणून १८७४ युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना करण्यात आली होती. त्याची वर्षपूर्ती म्हणून जागतिक टपाल दिवस सुरू करण्यात आला.

कोजागिरी पौर्णिमा - पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.

ईद-ए-मिलाद - ईद-ए-मिलाद म्हणजे 'अल्लाह'चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ' ईद-ए-मिलादुन्नबी' हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.

हेही वाचा: आला रे आला... रंगकर्मींचा सण आला!

१० ऑक्टोबर - जागतिक मानसिक दिवस

जगभारातील आत्महत्येचे प्रमाण कमी होऊन जागरूकता यावी म्हणून हा दिवस असतो. याची सुरूवात वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थने केली होती. याला WHO, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेंशन आणि युनायटेड फॉर ग्लोबल मेंटल हेल्थ यांचा सुरवाचीपासून पाठिंबा होतो.

११ ऑक्टोबर - जागतिक बालिकादिन

मुली आणि त्यांचे हक्क यासाठी हा दिवस सुरू झाला.

१५ - ए. पी. जे अब्दुल कलाम जयंती

ए. पी. जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला.

२० ऑक्टोबर - वर्ल्ड स्टॅटेस्टिक डे

हा दिवस दर ५ वर्षांनी साजरा करण्यात येतो. २०१० रोजी २० ऑक्टोबरला याची सुरूवात करण्यात आली. जगात माहितीच्या आकडेवारीच्या विश्वासार्हतेचे महत्व लक्षात यावे म्हणून युनायटेड नेशन्स स्टॅटेस्टिकल कमिशनने केली होती.

२१ ऑक्टोबर - वसूबारस

या दिवसापासून दिवाळीची सुरूवात होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्यांना भाजी, भाकरी, गुळ, डाळ खाऊ घातले जाते.

२२ ऑक्टोबर - धनत्रयोदशी

या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते.

२४ ऑक्टोबर - नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन

हा दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे. पहाटेपासूनच सगळीकडे पणत्या लावून प्रकाशमय केले जाते. घरातली अलक्ष्मी निघून जात धनलक्ष्मीचा वास असावा अशी प्रार्थना केली जाते. संध्याकाळी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते.

२५ ऑक्टबर - खंडग्रास सूर्यग्रहण

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होतं. यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचत नाहीत. या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे.

२६ ऑक्टोबर - बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज

बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा हा दिवस शुभ समजला जातो. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना आजच्या दिवशी करतात. या शुभ दिनी पत्नी पतीला सुगंधी तेल-उटणे लावते. पती अभ्यंगस्नान करुन येतो. यानंतर पत्नी पतीचे औक्षण (ओवाळणे) करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. बलिप्रतिपदा असल्यामुळे बळीराजाची पूजा करतात.

भाऊबीज - बहिण भावाचा हा दिवस असतो. दिवाळीचा शेवटचा दिवस असतो.

२९ ऑक्टोबर - जागतिक वारसा दिवस

लोकांना समृद्ध वारशाची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून लोकांना त्यांची संस्कृती आणि परंपरा जवळून समजून घेता येईल.

३१ ऑक्टोबर -

सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७ वी जयंती - वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ ओक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ३८ वा स्मृतीदिन - इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.

Web Title: October Special Days Festival Session Festival Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..