Palm Astrology : हातावरच्या या चिन्हांचा अर्थ माहितीये? हस्तशास्त्र सांगते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Palm Astrology

Palm Astrology : हातावरच्या या चिन्हांचा अर्थ माहितीये? हस्तशास्त्र सांगते...

Signs on Palm Tells Future : ज्योतिषशास्त्राचा एक महत्वाचा भाग असलेले हस्त रेखाशास्त्र यात आपल्या हातावरच्या रेषांवरून भविष्याचा अंदाज बांधला जातो हे आपण जाणतो. पण तो कसा हे समजून घ्यायचं असेल तर काही संकेत समजून घेणं गरजेचं असतं.

असेच काही चिन्ह, निशाण हे आपल्याला बरेच काही सांगत असतात. प्रत्येकाच्या हातावर सगळेच निशाण नसतात. तसंच कोणतं निशाण कुठे असावं हे पण महत्वाचं आहे. हे चिन्ह असणं शुभ समजलं जातं.

हेही वाचा: Astro Tips for Marriage : लग्नाचं वय होऊनही लग्न जमत नाही, करा हे उपाय

fish sign

fish sign

जाणून घेऊया

गज निशाण

हातावर गज निशाण अर्थात हत्तीसारखी खूण असल्यास नशीब चमकतं. धनवान होण्याचं लक्षण आहे.

माशाची खूण

हातावरील माशाची खूण म्हणजे संपत्तीचा लाभ होण्याचा योग दर्शवतो.

हेही वाचा: Astro Tips : दिवाळीत या भेटवस्तू कोणालाही देऊ नका

swastik sign

swastik sign

पालखीची खूण

हातावरील पालखीची खूण म्हणजे सुखसमृद्धी लाभण्याचे चिन्ह आहे.

स्वस्तिक खूण

हातावर स्वस्तिकची खूण म्हणजे प्रगतीचे आणि बढतीचे योग असतो असं मानलं जातं. या व्यक्तींना भरपूर मानसन्मान मिळतो.

हेही वाचा: Astro Tips : शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम उपाय; अनेक समस्या होतील दूर, एकदा वाचाच

kalash sign

kalash sign

कलशाची खूण

हातावरील कलशाची खूण ही धार्मिक संकेत देते. तुम्हाला धार्मिक कार्याची ओढ असल्याचं लक्षात येतं.

जहाजाची खूण

ज्या व्यक्तीच्या हातावर जहाजाची खूण असेल ती नशीबवान व्यक्ती असते. सुख-समृध्दी आणि धनधान्य लाभण्याचा योग असतो.

हेही वाचा: Diwali Astro Tip : ग्रह,वास्तुदोष दूर करणारी हे लकी प्लांट दिवाळीत आणा घरी

Trishul sign

Trishul sign

सूर्याची खूण

हातावर सूर्याची खूण म्हणजे धनवान असण्याचा तसंच प्रगतीचा योग दर्शवतो.

त्रिशुळाची खूण

हातावर त्रिशुळाची खूण म्हणजे सकारी नोकरीचा, आर्थिक बाजू भक्कम असल्याचा योग आहे असा संकेत आहे.

तराजूची खूण

हातावर तराजूची खूण असणे हा धनवान होण्याचा योग समजला जातो.