Astro Tips : दिवाळीत या भेटवस्तू कोणालाही देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : दिवाळीत या भेटवस्तू कोणालाही देऊ नका

दिवाळी जवळ आली आहे; दिवाळी हा सगळ्याच सणामधला खूप महत्त्वाचा सण म्हटला जातो. आपण सगळेच पूर्ण भारतात हा सण खूप जल्लोषात साजरा करतो. आता वेळ आली असेल ती आपल्या प्रियजनांना दिवाळी साठी एक खास भेटवस्तू देण्याची. आणि नक्की कोणाला काय घ्यावं याची यादीही तुम्ही करतच असाल पण यासगळ्यात काही गोष्टी गिफ्ट म्हणून घेणे टाळले पाहिजे.

हेही वाचा: Astro Tips : अशा पद्धतीने पिठाचा दिवा लावल्याने सुख,समृद्धी आणि कामात मिळेल यश

वास्तुशास्त्राच्या मते, अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या कोणालाही भेट म्हणून देयला नको. अशा वस्तू देऊन, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंदाच्या ठिकाणी दुःख किंवा त्रास सुरू होउ शकतो. तुमच्या नात्यातही कटुता येऊ शकते.

हेही वाचा: Astro Tips : सोमवारी हे उपाय केल्याने चंद्रदोष दूर होतो

ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. एखाद्याला भेटवस्तू देणं किंवा आपल्याला ती भेटवस्तू मिळणं प्रत्येकालाच आवडत असत. दिवाळीच कशाला तर वाढदिवस असो, लग्न असो किंवा नवीन घराचा वास्तू प्रवेश असो, लोक प्रत्येक शुभ प्रसंगी भेटवस्तू देतात. पण यात भेटवस्तूची नाही तर आपण त्या व्यक्तीच्या भावनेची किंमत करतो.

हेही वाचा: Diwali Astro Tips 2022 : दिवाळीमध्ये हे उपाय केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होईल

१. हिंसक प्राण्यांचे फोटो

भेटवस्तू म्हणून कोणत्याही हिंसक प्राण्याचे चित्र कधीही देऊ नये. वाघ, सिंह अशा प्राण्यांचे चित्र किंवा त्याच्याशी निगडित गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नये. कारण हिंसक प्राण्यांच्या या चित्रमुळे घरातही तसेच वातावरण निर्माण होऊ शकते. शिवाय चाकू कट्यार अशा गोष्टीही कोणाला देऊ नयेत.

हेही वाचा: Astro Tips: जास्वंदाच्या फुलाने उजळेल तुमचं नशीब; आजच घराच्या कोपऱ्यात लावा रोपटे

२ रुमाल

वास्तूशास्त्रात असे म्हटले आहे की एखाद्याला रुमाल भेट म्हणून देऊ नये. याने नात्यात कटुता येते; तुमच्या दोघांमधला तणाव वाढू शकतो. शास्त्रानुसार एकमेकांचा रुमाल वापरणही चुकीचं आहे.

हेही वाचा: Astro Tips: पायात सोन्याचे दागिने घातल्या मुळे लक्ष्मी देवीचा कोप होतो. गरीबी येऊ शकते

३. निसर्गाशी संबंधित फोटो

वास्तुशास्त्रानुसार, निसर्गाशी संबंधित चित्रे भेट म्हणून देयला नको. विशेषत: वाळवंट, कोरडी झाडे, बुडणारी जहाजे आणि सूर्यास्ताचे देखावे यांची छायाचित्रे कोणालाही देऊ नयेत किंवा ती कोणाकडूनही घेऊ नयेत. याचे मुख्य कारण म्हणजे ह्या अशा चित्रांना बघून त्यांच्या घरात असण्याचे घराचे वातावरण तसे व्हायला लागते.

हेही वाचा: Astro Tips : दही साखर खाल्ली आहे का? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे

४. घड्याळ

लग्न सोहळ्यात किंवा वास्तुशांतीला अनेकदा घड्याळ ददेण्याला लोकांकडे प्राधान्य असतं. पण असं म्हणतात की कोणाचे घड्याळ घालुही नाही आणि आपले घड्याळ कोणाला घालायला देऊही नाही. कारण याने समोरच्याची वेळ आपल्या माथी मारली जाते. म्हणून कोणीही भेट म्हणून घड्याळ देऊ नये.