Pitru Paksha : पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा 'हे' उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pitru Paksha

Pitru Paksha : पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

Pitru Dosh : ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू आहे. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया.

हेही वाचा: Pitru Paksha: या पितृपक्षाला करा टेस्टी तांदळाची खीर

पितृदोष असेल तर,

कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब होत राहणे. उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते.

हेही वाचा: Pitru Paksha : यंदा 'या' तारखांना केले जाईल श्राद्ध

वारंवार अपघात

पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ शकतो. यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.

हेही वाचा: Pitru Paksha Thali : या पदार्थांसह असे वाढा पितरांचे ताट

कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे अविवाहित राहणे

कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे, परंतु लग्न जमत नाही. याशिवाय कुटुंबातील व्यक्ती लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो.

हेही वाचा: Pitru Paksha: टेस्टी अन् खुसखुशीत काकडीचे वडे, पहा रेसिपी

संतती सुख न मिळणे

पितृ दोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते. मूल असले तरी ते मंद, दुर्बल किंवा अपंग असते.

हेही वाचा: Pitru Paksha 2022: पितृपक्षात 'या' गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर लागु शकतो पितृदोष

कुटुंबात कलह

धन-संपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे, अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत. पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते, त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते.

हेही वाचा: Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

पितृदोषासाठी उपाय

  • पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे.

  • संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा. रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा.

  • जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा. लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा.

  • पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे चित्र ठेवा आणि रोज त्याचे स्मरण करा. यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो.

Web Title: Pitru Paksha Pitru Dosh Try These Solutions To Avoid Pitru Dosh Effects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pitru Paksha