Rahu Gochar 2023 : तुमच्या कुंडलीतील राहु बरोबर नसेल तर या रंगाचे कपडे घालू नका, नाहीतर...

शनी, राहू आणि केतू. राहू आणि केतूचे संक्रमण प्रत्येक दीड वर्षात होत असून या वर्षी राहू आणि केतूचे संक्रमण ३० ऑक्टोबरला होणार आहे.
Rahu Gochar
Rahu Gocharesakal

Rahu Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या 9 ग्रहांचा त्याच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. वेळोवेळी ग्रहांच्या स्थितीत बदल होतो, ग्रहांची युती होते, शुभ-अशुभ योगही तयार होतात. या सर्वांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. यातील काही ग्रह असे आहेत की त्यांना क्रूर मानले जाते. जसे- शनी, राहू आणि केतू. राहू आणि केतूचे संक्रमण प्रत्येक दीड वर्षात होत असून या वर्षी राहू आणि केतूचे संक्रमण ३० ऑक्टोबरला होणार आहे.

कुंडलीतील राहुची अशी दशा आणतील समस्या

ज्योतिषशास्त्रानुसार राहुला सावलीचा ग्रह म्हणतात. राहु कुंडलीत वरचा असेल तर व्यक्ती प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊ शकते. अशे व्यक्ती खूप मेहनती आणि प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. ते जीवनात उच्च स्थान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करतात. श्रेष्ठ राहु माणसाला मुत्सद्दी बनवतो. त्यांचे जीवन अपार सुख आणि समृद्धीने भरलेले राहील.

याउलट कुंडलीत राहु अशुभ असेल किंवा राहु बरोबर नसेल तर तो माणसाला वाईट संगती, नशा आणि वाईट सवयींचा बळी बनवतो. त्याच वेळी, तो मानसिक तणावाचा बळी राहतो. अशा स्थितीत जेव्हा राहू शत्रू ग्रहांशी संयोग करतो तेव्हा अशा राशीच्या जीवनातील त्रास अधिक वाढतो.

Rahu Gochar
Grah Gochar 2023 : एप्रिलमधे बनताय 2 विनाशकारी योग, या राशींनी सावध राहा, नाहीतर...

राहु दोष दूर करण्याचे उपाय

अशा स्थितीत व्यक्तीने राहू दोष दूर करण्यासाठी काही उपाय केले पाहिजे, अन्यथा राहु त्याला अधिक त्रास देतो. ज्या लोकांच्या कुंडलीत राहु अशुभ आहे त्यांनी 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राहु संक्रमणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करावेत. (Astrology)

Rahu Gochar
Guru Gochar 2023 : गुरु संक्रमण बदलेल या 3 राशींचं भाग्य, करियर अन् व्यवसायात मिळेल जोरदार यश

राहु बरोबर नसेल तर त्या व्यक्तीने निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत

- राहु दोष असेल तर व्यक्तीने आपल्या संगतीची काळजी घ्यावी. त्याने चुकीच्या संगतीपासून दूर राहिले पाहिजे.

- राहु अशुभ असेल तर व्यक्तीने नशेपासून दूर राहावे, अन्यथा राहूचा अशुभ प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

- राहु दोष असल्यास कोणाचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही खूप वाईट परिस्थितीत अडकू शकता. (Rahu Gochar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com