

Rahu Ketu Transit 2026: What Changes in December?
esakal
Rahu Ketu Transit 2026: What Changes in December?: वर्षाचा शेवट काही राशींसाठी आर्थिक दृष्टीने चांगला ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतू हे छाया ग्रह साधारण १८ महिन्यांनी आपली राशी बदलतात. सध्या राहू कुंभ राशीत, तर केतू सिंह राशीत असल्याचं सांगितलं जात आहे.
डिसेंबर २०२६ मध्ये हे दोन्ही ग्रह मकर आणि कर्क राशीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा काही राशींना फायदा होऊ शकतो. विशेषतः उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणे, अडकलेला पैसा परत मिळणे आणि व्यवसायातून फायदा होण्याचे संकेत मानले जात आहेत. चला तर मग, कोणत्या राशींसाठी हा काळ आर्थिक बाबतीत अनुकूल ठरू शकतो ते जाणून घेऊया.