Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनासाठी भद्रा दोष मानू नये हे खरं आहे का? जाणून घ्या समज गैरसमज

शास्त्रात रक्षाबंधनाविषयी काही महत्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत. तसेच यासंबंधित काही समज आणि गैरसमज सुद्धा आहेत
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023esakal

Raksha Bandhan 2023 : आई-वडिलांप्रमाणेच बहीण भावाचे नातेसुद्धा भावनिक असून आई-वडिलांनंतर आपुलकीने एकमेकांची काळजी करणारे असतात ते बहीण भाऊ. या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. मात्र शास्त्रात रक्षाबंधनाविषयी काही महत्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत. तसेच यासंबंधित काही समज आणि गैरसमज सुद्धा आहेत. चला तर त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

रक्षाबंधन सण साजरा करताना पौर्णिमा तिथीचा अर्धा भाग जो भद्रा नावाचा करण आहे, त्या भद्रेवरती रक्षाबंधन करू नये असे शास्त्र सांगते. रक्षाबंधनाला पूर्वीच्या काळी फक्त राजालाच राखी बांधल्या जात होती, त्यामुळे सांप्रत भावाबहिणीच्या रक्षाबंधनासाठी भद्रा दोष मानू नये या अर्थाचे गैरसमज पसरवले जात आहेत.

पूर्वी राजाला रक्षासूत्र बांधले जात होते व सर्वसामान्य लोकसुद्धा रक्षाबंधन करून घेत असत याविषयी पुराणात खालील वचन आलेले आहे. यामध्ये रक्षाबंधन विधीवत केल्यास वर्षभर ती व्यक्ती परिवारासह सुखी समाधानी राहते अशी फलश्रुती देखील दिलेली आहे. (Culture)

‘य: श्रावणे विमलमासि विधानविज्ञो रक्षाविधानमिदमाचरते मनुष्य: । आस्ते सुखेन परमेण स वर्षमेकं पुत्रप्रपौत्रसहित: ससुह्रज्जन: स्यात् ॥‘ यामध्ये ‘मनुष्य:‘

वरील ओळींतून मनुष्यमात्राचा अधिकार रक्षाबंधनासाठी असून फक्त राजाचाच अधिकार आहे असे सिद्ध होत नाही. राजा जसा रक्षणकर्ता आहे तसा भाऊ देखील रक्षणकर्ताच असतो. त्यामुळे रक्षाबंधन कोणालाही करायचे असो ते करू शकतात. सदर रक्षाबंधनासाठी देखील भद्रेचा त्याग करावा. (Raksha Bandhan)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना देऊ नका हे गिफ्ट, जाणून घ्या कारण

संपूर्ण दिवसभर जर भद्रा असेल तर संपूर्ण दिवस सोडणे शक्य नसते. यासाठी भद्रामुखाचा जो कालावधी म्हणजे सायंकाळी 05:22 ते 07:22 या भद्रा मुखाच्या कालावधीत फक्त रक्षाबंधन करू नये. हा भद्रा मुखाचा कालावधी सोडून बाकी दिवसभर केव्हाही रक्षाबंधन करता येईल. भद्रेची समाप्ती रात्री 08:05 वाजता होत आहे; त्यानंतर रक्षाबंधन केल्यास अतिशय उत्तम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com