Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना देऊ नका हे गिफ्ट, जाणून घ्या कारण

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही आपल्या बहिणींना जर या भेटवस्तू देणार असाल तर थोडासा करा विचार.
raksha bandhan 2023
raksha bandhan 2023Sakal
Updated on

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण. या सणानिमित्ताने बाजारपेठांमध्येही रंगीबेरंगी व एकापेक्षा एक सुंदर राखी तसेच भेटवस्तू उपलब्ध झाले आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला काय-काय गिफ्ट्स द्यावेत, सध्या याबाबत सर्व भाऊ विचार करत असतील.

तुम्ही देखील हाच विचार करताय का दादा. पण बहिणीला गिफ्ट देताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती… 

raksha bandhan 2023
Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमा नेमकी कधी आहे 30 की 31 ऑगस्ट? जाणून घ्या कोणत्या दिवशी करावा उपवास

काळ्या रंगाचे कपडे गिफ्ट करू नका

रक्षाबंधन सणानिमित्त (Raksha Bandhan 2023) जर लाडक्या बहिणीला कपडे किंवा दागिने भेटवस्तू स्वरुपात देणे शुभ मानले जाते. पण काळ्या रंगाचे कपडे मुळीच गिफ्ट करू नका. यामुळे नात्यात तणाव वाढण्याची शक्यता असते, असे म्हणतात. 

raksha bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : बहीण-भाऊचे नाते अधिक होईल मजबूत, पाठवा आपल्या दादा-ताईला या खास शुभेच्छा

फुटवेअर गिफ्ट करू नका

आपण बहिणीला फुटवेअर गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर ही चूक मुळीच करू नका. असे मानले जाते की या खास दिवशी सँडल किंवा एखादे फुटवेअर गिफ्ट केल्याने नात्यात कटुता निर्माण होते. 

या वस्तू मुळीच देऊ नका 

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना मिक्सर-ग्राइंडर, धारदार वस्तू, आरसे, फोटो फ्रेम, घड्याळ, रुमाल यासारख्या वस्तू भेट देणे टाळावे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.  

बहिणीला द्या हे गिफ्ट

बहीण हे बुध ग्रहाचे कारक आहेत, अशी धार्मिक मान्यता आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या बहिणीला कपडे, दागिने, पुस्तके, डायरी, मोबाइल किंवा लॅपटॉप या वस्तू गिफ्ट करू शकता. यामुळे बुध ग्रह मजबूत होईल. 

raksha bandhan 2023
Raksha Bandhan Special Recipe : रक्षा बंधनाला भावाचं तोंड गोड करण्यासाठी बनवा खास काजूचा हलवा, ही घ्या रेसिपी

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com