Raksha Bandhan 2023 : अरे देवा ! यंदा राखी पौर्णिमेचा मुहूर्त रात्री 8 नंतर, जाणून घ्या सविस्तर

या दिवशी भद्रा म्हणजे वृष्टी नावाचा एक कर्ण असणार आहे.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023esakal
Updated on

Raksha Bandhan Shubha Muhurta :

श्रावण महिना आला की, व्रत वैकल्यांबरोबर सणावारांचीही रेलचेल असते. या महिन्यात विशेषतः भावाचे कौतुक केले जाते. नागाला भाऊ मानून नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो. तर बहिण भावाच्या नात्यातला गोडवा जपत बहिणीच्या रक्षणाचा बंध जपणारा सण रक्षाबंधनही श्रावणातच येतो.

यंदा रक्षा बंधन ३० ऑगस्ट रोजी आहे. परंतु याचा मुहूर्त मात्र रात्री 8 नंतर आहे. असे का जाणून घेऊया.

खगोल अभ्यासक आणि देशपांडे पंचांगकर्ते पंडित गौरव देशपांडे यांनी या दिवसातील शुभ, अशुभ योगांविषयी सांगितले आहे. जाणून घेऊया.

राखी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 8 वाजून 5 मिनीटांपर्यंत भद्रा अर्थात वृष्टी कर्ण आहे. शास्त्रानुसार भद्रेवरती राखी बांधू नये. त्यामुळे या काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे रात्री 8 पर्यंत राखी बांधू नये.

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी?

भद्रा मुख

अगदीच रात्री 8 पर्यत वाट पाहणे शक्य नसेल तर किमान सध्यांकाळी 5.30 ते 7.30 हे दोन तास तरी राखी बांधू नये. कारण हा काळ भद्रा मुख काळ आहे. हा काळ वर्ज करून उर्वरीत दिवसभरात कधीही राखी बांधू शकतात.

राखी बांधताना हे लक्षात ठेवा

रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताना बहिणीने पुढील मंत्राचे उच्चारण करावे.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।

तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

When is Raksha Bandhan 2026? Know Date, Muhurat and Time 
pandharpur aashadhi wari
Pandharpur Visit: Eknath Shinde Targets Uddhav Thackeray Over Ram Raksha Campaign
Uddhav Thackeray Targets BJP Over Alleged Ram Mandir
Marathi News Esakal
www.esakal.com