Vanar Sena: रावणासोबत लंकेत झालेल्या युद्धानंतर कुठे गेली वानर सेना, कशी तयार झाली श्रीरामाची वानर सेना

The Story of the Vanar Sena from Ramayana: लंकेमध्ये एकीकडे रावणाची असुरी सेना होती तर दुसरीकडे श्रीरामाची वानर सेना. युद्धाची पहिली वेळ असूनही या वानर सेनेने रावणाच्या सेनेला पाणी पाजलं. असं म्हंटलं जातं की श्रीरामांची वानर सेना ही जवळपास १ लाखच्या आसपास होती.
Story of the Vanar Sena from Ramayana
Story of the Vanar Sena from RamayanaEsakal
Updated on

The Story of the Vanar Sena: रामायणात श्रीरामांच्या वानर सेनेची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. जेव्हा श्रीरामचंद्र सीतेला लंकेतून SriLanka पर आणण्यासाठी निघाले तेव्हा रावणाशी दोन हात करण्यासाठी त्यांनी वानर सेनेला सोबत घेतलं. Ramayana where did huge monkey army gone after war with ravana what happened to it then

उत्तर रामायणात Ramayana उल्लेख असल्याप्रमाणे श्रीरामाने निर्माण केलेली वानर सेना ही एकमेव वानरांची सेना असून त्याकाळात एखाद्या युद्धात सहभाग घेणारी ती पहिली सेना होती. विविध राज्यांतून वानरांना एकत्रित आणून ही सेना तयार करण्यात आली होती.  या वानर सेनेला स्वत: श्रीरामाने SriRam अस्त्र-सस्त्र आणि युद्धाचं प्रशिक्षण दिलं होतं.

लंकेमध्ये एकीकडे रावणाची असुरी सेना होती तर दुसरीकडे श्रीरामाची वानर सेना. युद्धाची पहिली वेळ असूनही या वानर सेनेने रावणाच्या सेनेला पाणी पाजलं. असं म्हंटलं जातं की श्रीरामांची वानर सेना ही जवळपास १ लाखच्या आसपास होती.  मात्र अनेकांना हा प्रश्न पडतो की रावणाचा पराभव केल्यानंतर ही एवढी सेना गेली तरी कुठे?

पुराणांमधील उल्लेखानुसार आपणा सर्वाना ठाऊक आहेच की रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत परतले. यावेळी त्यांच्यासोबत वानर सेना नव्हती. मग ही सेना कुठे गेली? तसचं या वानर सेनेचं नेतृत्व करणारे महान योद्धा सुग्रीव आणि अंगद याचं काय झालं ते देखील कुठे गेले? कारण त्यानंतर रामायणात त्यांचा फारसा उल्लेख आढळत नाही.

हे देखिल वाचा-

Story of the Vanar Sena from Ramayana
Ramayana: अनोख्या रुपात सादर होतंय 'वाल्मिकी रामायण'; दीड लाखांहून अधिक किंमत

कुठे गेली वानरसेना?
उत्तर रामायणातील काही उल्लेखांनुसार लंकेतून परतल्यावर श्रीरामांनी वानर सेनेचे प्रमुख सुग्रीव यांना किष्किन्धा राज्याचं राजा बनवलं तर अंगदला युवराज. सुग्रीव आणि अंगद यांनी अनेक वर्ष इथं राज्य केलं आणि राज्याचा विस्तारही केला.

उत्तर रामायणानुसार रावणाचा पराभव केल्यानंतर वानर सेना सुग्रीवासोबत गेली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही युद्धात सहभाग घेतला नाही.

वानर सेनेतील अनेक योद्धे सुग्रीवाच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांवर विराजमान झाले. वानर सेनेमध्ये महत्वापूर्ण भूमिका बजावणारे नल-नील यांनी देखील अनेक वर्ष किष्किन्धा राज्यात सुग्रीवाच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. हे किष्किन्धा राज्य आजही अस्तित्वात आहे. इथं आजही वानरसेनेच्या वास्तव्य़ाच्या खुणा आढळतात.



कुठे आहे किष्किन्धा
किष्किन्धा कर्नाटक राज्यातील बिल्लोरी जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे.  हे नगर हम्पीपासून अगदी जवळ आहे. किष्किन्धा हे निसर्गरम्य असून इथं अनेक गुंफा आहेत. या मोठ्या गुंफांमध्येच वानर राहायचे असं म्हंटलं जातं.

उत्तर रामायणातील उल्लेखानुसार लंकेतून परतल्यानंतर वानर सेना आणि श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वेगवेगळे मार्ग निवडले असले तरी. वानर सेना पुन्हा एकदा श्रीराम यांच्या भेटीसाठी अयोध्येत गेली होती. श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण वानरसेना अयोध्येत गेली होती. यावेळी श्रीरामांचं दर्शन घेऊन ते पुन्हा परतले.

असं म्हंटलं जातं की सुग्रीवाने त्यांचं राज्य श्रीरामांकडे अयोध्येच्या अधिन करण्याचं निवेदन दिलं होतं. मात्र श्रीरामांनी त्यास नकार दिला आणि वानर सेनेला त्यांचं स्वातंत्र्य उपभोगण्यास सांगितलं.

हे देखिल वाचा-

Story of the Vanar Sena from Ramayana
Adipurush Trailer: श्रीराम हनुमानाच्या पाठीवर कधी बसले? रामायण मालिकेतील लक्ष्मण आदिपुरुषच्या ट्रेलरवर नाराज

वानर सेनेच्या मदतीने तयार झाला रामसेतू
लंकेत जाण्यासाठी श्रीराम रामेश्वरम इथं पोहचले जिथून लंकेचं अंतर कमी तर होतं मात्र मध्ये होता तो पश्चिम महासागर. मात्र राम भक्त असिनलेल्या विश्वकर्माचे पूत्र नल आणि नील यांच्या मदतीने सर्व वानरांनी पूल बांधण्यास सुरुवात केली. हाच पूल कालांतराने रामसेतू म्हणून ओळखला जाऊ लागला.

ही वानरसेना अनेक तुकड्यांमध्ये विभागलेली होती. प्रत्येत तुकडीचा एक सेनापती होता. या सेनापतीला यूथपति म्हंटलं जात. लंकेवर आक्रमण करण्यासाठी सुग्रीवाने वानर सेना उभारली होती. विविध छोट्या राष्ट्रातील म्हणजेच किष्किंधा, कोल, भील, रीच आणि जंगलांमध्ये राहणाऱ्या वानऱांच्या तुकड्या एकत्र येऊन ही सेना तयार झाली होती.

पुराणांमधील उल्लेखानुसार लंका युद्धानंतर वानरसेनेमधील अनेत तुकड्या या त्यांच्या राज्यात परतल्या. त्यानंतर त्यांनी कोणत्याही युद्धात सहभाग घेतल्याचा उल्लेख नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com