Adipurush Trailer: श्रीराम हनुमानाच्या पाठीवर कधी बसले? रामायण मालिकेतील लक्ष्मण आदिपुरुषच्या ट्रेलरवर नाराज

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
shri ram, sunil lahiri, Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut, bharatkumar raut
shri ram, sunil lahiri, Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut, bharatkumar raut SAKAL

Adipurush Trailer Sunil Lahri News: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

आदिपुरुषचा ट्रेलर काल ९ मेला मुख्य कलाकार आणि सिनेमाच्या टीमच्या उपस्थितीत लाँच झाला.

आदिपुरुष सिनेमाच्या टिझरवर लोकांनी टीका केली. पण सिनेमाच्या ट्रेलरला मात्र लोकांनी उचलून धरलं.

आदिपुरुषच्या ट्रेलरवर मात्र रामायण मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी यांनी नाराजी व्यक्त केलीय.

(When did Shri Ram sit on Hanuman's back? Lakshman sunil lahri Adipurush trailer of Ramayana serial upset)

shri ram, sunil lahiri, Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut, bharatkumar raut
The Kerala Story: जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, द केरळ स्टोरी बद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं

'आदिपुरुष'च्या ट्रेलरमध्ये सुनील लाहिरीला काय आवडले नाही? याबाबत ते म्हणाले की, रामजींना हनुमानजींच्या पाठीवर बसवले आहे.

राम हनुमानजींच्या वर बसून बाण सोडत आहेत. सुनील लाहिरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रामायणात असे कुठेही पाहिले किंवा वाचले नाही.

सुनीलच्या म्हणण्यानुसार, हनुमानाच्या पाठीवर बसून लक्ष्मणाने बाण सोडले, रामाने नाही.. अगदी हे जुन्या पुराणात सुद्धा दिसून येते.

सुनील लाहिरी पुढे म्हणाले की, राम हनुमानाच्या खांद्यावर बसला आहे, पण तो उडू शकत नव्हता. सुनील लाहिरी यांच्या म्हणण्यानुसार, जर तो उडू शकला असता तर भगवान इंद्राने रामासाठी रथ पाठवला नसता.

'आदिपुरुष'मधील राम आणि लक्ष्मण यांच्या वेशभूषेमुळे सुनील लाहिरीही निराश झाले आहेत. सुनीलने सांगितले की, जेव्हा जेव्हा रामायणातील वनवासाच्या वेशभूषेचा विषय आला तेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता हे सर्व भगव्या रंगाच्या कपड्यात दाखवले होते.

पण 'आदिपुरुष'मध्ये राम, लक्ष्मण वनवासात पूर्णपणे कपड्याने झाकलेला दाखवला आहे. सुनील लाहिरी यांनी मान्य केले की व्हीएफएक्स आणि तंत्रज्ञानामध्ये पौराणिक कथा मिसळण्यात काही नुकसान नाही, परंतु त्याचे सार खराब होऊ नये. रामायणाचा आत्मा खराब होऊ नये, अशा भावना सुनील लाहिरी व्यक्त केलीय.

'आदिपुरुष' च्या टीझरच्या तुलनेत ट्रेलरमध्ये व्हीएफएक्स आणि एनिमेशनवर किती काम करण्यात आलंय हे सांगणं कठीण आहे. पहिल्या नजरेतच तुम्हाला अनेक सीनमध्ये व्हीएफक्सचा भरणा दिसेल. पण कलाकारांचे डायलॉग आणि बॅकग्राऊंड म्युझिकपुढे हे व्हीएफएक्स अतिरंजक वाटत नाहीत. सिनेमाचं बॅकग्राउंड म्युझिक आणि जय श्री रामचा नारा प्रेक्षकांचा जोश वाढवतात एवढं मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com