

Shani Dev
esakal
Shani Dev BLESSINGS: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्मफळदाता मानलं जातं. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार शनी शुभ किंवा कठीण परिणाम देतात, असं मानलं जातं. त्यामुळे शनिदेवाची कृपा एखाद्या राशीवर असेल तर मेहनतीचं चांगलं फळ मिळण्यासोबतच करिअर आणि आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते.
आगामी काळात मिथुन, तूळ आणि मकर या तीन राशींसाठी शनीचा काळ शुभ ठरण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, नोकरी-व्यवसायात प्रगती आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत आहेत. चला, या तीन राशींचं भविष्य जाणून घेऊया.