

Rahu in kundli
Sakal
Rahu in kundli: राहू केतू हे जणू मॅगनेटसारखे काम करतात. इतके ते जनमानसावर हावी झालेले आहेत. वर्तमानपत्र, सोशल मिडिया कुठेही राहू हा शब्द जरी ऐकला तरी कान टवकारले जातात आणि जे काही हाती पडेल त्याचे वाचन होते. वाचन कसले पारायण म्हणा हवे तर. नवग्रह हे आपल्यासोबत आयुष्य जगत असतात किंबहुना आपल्या आयुष्याचा आरसा म्हणजेच हे सर्व ग्रह. ग्रह हे तटस्थ असतात, त्यांचे कुणी आवडते-नावडते नाही तर व्यक्तीच्या कर्माप्रमाणे ते फळ देण्यास बांधिल असतात.