Shravan 2022: श्रावण महिन्यात हे '5' उपाय करून पाहा आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणा...

श्रावण महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वीवर येतात असा लोकांचा समज आहे.
Shravan 2022
Shravan 2022Esakal

आताच काही दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिना म्हटला की भगवान महादेव यांचा महिमा आलाचं.भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरीत प्रसन्न होतात.आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात.श्रावन महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे.त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण, यावेळी जर का पूजा करतांना चूक झाली तर त्याचाही विपरीत परिणाम होतो बर का !

श्रावण हा असा महिना आहे जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीला वरदान दिले होते की, मी तुला आपली पत्नी म्हणून स्विकारील आणि जो कोणी या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात हे उपाय करून पाहा आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणा.

Shravan 2022
Shravan 2022 : हर हर महादेव; तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय?

श्रावण महिण्यांत धन समृद्धीसाठी आणण्यासाठी हे उपाय करा..

1)जर तुम्हाला सतत पैसाची चणचण भासत असेल तर शिव पार्वतीची मनोभावे पूजा करून त्यांना केशर टाकून दुधाच्या खिरीच्या नैवेद्य दाखवावा. या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतील त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतील.

2) जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल तर श्रावण सोमवारी उसाच्या रसाने भगवान शंकराचा रुद्राभिषेक करा. हा उपाय केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती बळकट होईल.

3)महादेवाच्या मंदिरात बेलच्या झाडाखाली बसलेल्या जास्तीत जास्त गरजू लोकांना खीर द्यावी. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते आणि तुमच्या आर्थिक समस्याही संपतात.

4)जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला कोणताही जुनाट आजार किंवा रोग असेल तर अशा व्यक्तीने श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी मोहरीच्या तेलाने भगवान शंकराला रुद्राभिषेक करावा. असे केल्याने पीडित व्यक्तीच्या वेदना कमी होऊ शकतात.

5) जर तुम्हाला शक्य झाले तर सव्वा लाख मातीचे आणि एक कोटी मातीचे शिवलिंग बनवून त्यांची पुजार्‍याकडून पूजा करून घ्यावी.हे गरजेचे नाही की तुम्ही हे शिवलिंग एका दिवसात बनवा आणि त्यांची पूजा करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठराव घेऊन त्यांची हळूहळू पूर्तताही करू शकता. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते आणि आर्थिक त्रासही कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com