Shravan 2026: भारतात श्रावण एकाच वेळी का सुरू होत नाही? वेगवेगळ्या तारखा का असतात? जाणून घ्या रंजक शास्त्र!

Shravan Month Origin & Dates: पंचांगाच्या दोन वेगवेगळ्या पद्धती अन् 'श्रवण' नक्षत्राशी असलेला संबंध; वाचा सविस्तर माहिती....
Shravan 2026 Start Date Mystery: Why North And South India Observe Different Dates

Shravan 2026 Start Date Mystery: Why North And South India Observe Different Dates

esakal 

Updated on

The Science Behind Shravan: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. महाराष्ट्रात १३ ऑगस्ट २०२६ ला श्रावण महिना सुरू होत आहे. भगवान शिवाच्या उपासनेचा हा काळ मानला जातो. या संपूर्ण महिन्यात भाविक रुद्राभिषेक, जलाभिषेक आणि श्रावणी सोमवाराचे उपवास करून महादेवाची आराधना करतात. पण, भारतात दरवर्षी एकाच वेळी श्रावण महिना सुरू होत नाही. उत्तर भारतात श्रावण आधी सुरू होतो, तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात तो जवळपास १५ दिवस ते महिनाभराने सुरू होतो. या तारखांमधील फरकाचे नेमके कारण काय आणि 'श्रावण' हे नाव कसे अस्तित्वात आले, हे समजून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com