Astrological Alert: तुमची 'ही' रास तर नाही ना? सूर्याचे मिथुन राशीत गोचर; सामोरे जावे लागणार आर्थिक आणि कौटुंबिक तणावांना...

Sun Transit in Gemini: सूर्याच्या मिथुन राशीत गोचरामुळे वृषभसह चार राशींना आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Sun Transit in Gemini to Impact Badly for These Zodiac Signs
Sun Transit in Gemini to Impact Badly for These Zodiac Signs sakal
Updated on

Sun in Gemini May Disrupt Finances and Relationships for These Signs: 15 जून 2025 रोजी सकाळी 6:52 वाजता सूर्याचे मिथुन राशीत गोचर होणार आहे. या गोचरामुळे बुधादित्य योग, भद्र योग आणि राजलक्षण योग तयार होतील. जरी सूर्य शुभ ग्रह मानला जात असला, तरी त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगळा होतो. यंदाच्या गोचरात काही राशींना संधी मिळतील, तर काहींसमोर अडचणी उभ्या राहतील. वृषभसह या चार राशींनी विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे.

वृषभ

या काळात वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण मोहापायी चुकीचे आर्थिक निर्णय होण्याची शक्यता आहे. कुणाच्याही गोड बोलण्याला भुलू नका आणि कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलण्याआधी नीट विचार करा.

कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सौम्यपणे आणि प्रेमाने बोला. तसेच नातेसंबंध टिकवण्यासाठी समतोल राखा. घरातील संपत्तीविषयक गोष्टींवर सध्या चर्चा करू नका. या नकारात्मक परिणामांपासून बचाव करण्यासाठी पितृपूजन करा आणि पितरांना खिरीचा नैवेद्य अर्पण करा, यामुळे त्यांच्या कृपेचा लाभ मिळेल.

कर्क

या राशीसाठी सूर्याचे गोचर फारसं फायदेशीर ठरणार नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्ही मेहनत करत राहाल, पण अपेक्षित यश मिळायला वेळ लागू शकतो, म्हणून धीर ठेवणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना कुणा जाणकाराचा सल्ला घ्या आणि कोणताही निर्णय घाईने घेऊ नका.

कौटुंबिक आयुष्यात थोडे तणावाचे प्रसंग येऊ शकतात, विशेषतः जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. या सगळ्याचा समतोल राखण्यासाठी दररोज गायीला हिरवा चारा द्या आणि गरजू लोकांना हिरव्या भाज्यांचं दान करा, यामुळे मन शांत राहील आणि स्थैर्य मिळेल.

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकते. कुणालाही शब्द देताना काळजी घ्या, कारण पूर्ण न करता आल्यास अडचणीत येऊ शकता. नोकरी करणाऱ्यांनी कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. मनःशांतीसाठी कामाचे योग्य नियोजन करा. पैसे व्यवहार करताना अधिक दक्षता घ्या. कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी भगवान शंकराची पूजा करा आणि त्यांना गूळ अर्पण करा. यामुळे शुभ फलप्राप्ती होईल.

मकर

या राशीच्या लोकांनी आपल्या शत्रूपासून आणि प्रतिस्पर्ध्यांपासून खबरदारी घ्यावी लागेल. कामात अपेक्षित यश न मिळाल्यास राग अनावर होऊ शकतो, पण संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या एखाद्या चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात. कामात प्रामाणिक राहा, यश नक्की मिळेल. कौटुंबिक आयुष्यात थोडी अस्थिरता जाणवेल. मुलगा किंवा मुलासमान व्यक्तीस पिवळ्या रंगाचे वस्त्र भेट द्या. यामुळे ग्रहांचा प्रभाव सौम्य होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com