

17 February Surya Grahan 2026
Sakal
Solar eclipse 2026 wealth prediction zodiac: यंदा वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. हे ग्रहण महाशिवरात्रीच्या बरोबर दोन दिवसांनी आणि फाल्गुन अमावस्येला लागत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, या काळात सूर्य कुंभ राशीत असेल. विशेष म्हणजे, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक काळ लागू होणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचे परिणाम सर्व 12 राशींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जाणवतील. काही राशींसाठी, हा काळ सकारात्मक बदल आणि नवीन संधी आणू शकतो. या सूर्यग्रहणासाठी कोणत्या राशी भाग्यवान असणार आहे हे जाणून घेऊया.