Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण काळात भोजन का करु नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surya Grahan 2022

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण काळात भोजन का करु नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Surya Grahan 2022 : यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला मंगळवारी आहे. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, ज्याचा प्रभाव पृथ्वीवरील सजीवांवर दिसून येतो. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाच्या नियमांबद्दल माहिती सांगितली आहे. ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात ग्रहणकाळात अशी अनेक कामे असतात, जी टाळावीत. त्यापैकी एक म्हणजे ग्रहण काळात भोजन करणे.

(Surya Grahan 2022 scientific reason to not eat food during solar eclipse)

हेही वाचा: Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी करु नये ही कामे, काय करावे ते जाणून घ्या

धार्मिक पुराणातील उल्लेखानुसार असे मानले जाते की ग्रहण काळात मनुष्य जेवढे जास्त धान्य खाईल, त्याला तेवढी वर्षे नरक यातना भोगावी लागतील. याशिवाय ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने व्यक्तीला पोटाचे आजार होतात, असेही नमूद आहे.

याशिवाय ग्रहणाच्या काही वेळाआधी पाण्याच्या सर्व स्त्रोतांवर दर्भ ठेवावे व पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. ग्रहण संपल्यानतंर आंघोळ करावी व त्यानंतरच जेवण करावे. कारण ग्रहणाच्या वेळी वातावरणात असलेले बॅक्टेरिया तुमच्या शरीरावर साचतात. आंघोळ केल्याने हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरावरुन निघून जातील.

हेही वाचा: Surya Grahan 2022 : दिवाळी नंतर लागणार सूर्य ग्रहण, ‘या’ राशींनी घ्या काळजी

ग्रहण काळात जेवण करुन नये याला वैज्ञानिक आधार देखील आहे. ग्रहणाच्या वेळी वातावरणात येणार्‍या अतिनील किरणांमुळे (UV Rays) अन्न विषारी होते हे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये समोर आले आहे. म्हणून बहुतेक लोक ग्रहण काळात उपवास करतात तथा करावा.

जरी ग्रहण काळात अन्न खाण्यास मनाई आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये काही लोकांना खाण्याची सवलत दिली जाऊ शकते. यात वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला किंवा रुग्ण अन्न घेऊ शकतात मात्र यांनी अन्न घेताना त्यात तुळशीची पाने जरुर टाकावी.

टॅग्स :sun